advertisement

अजितदादांचा घात की अपघात? रोहित पवार यांनी विमान कंपनीच्या मालकाचा दावा खोडला, ५ रोखठोक सवाल विचारले

Last Updated:

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सरकारने कोणतीच चौकशी केली नाही. पण सरकारने जर उशीर केला तर सगळे मॅनेज केले जाईल, अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली.

रोहित पवार पत्रकार परिषद
रोहित पवार पत्रकार परिषद
मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भाने त्यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी नवे दावे करणारी तसेच अनेक शंका उपस्थित करणारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी विमान कंपनीच्या कारभारावर शंका उपस्थित करीत विमानाच्या अवस्थेबद्दल काही रोखठोक प्रश्न विचारले. त्याचवेळी अपघातानंतर विमान मालकाने घाईघाईने विमानाची स्थिती चांगली होती, अशी प्रतिक्रिया दिली याकडे लक्ष वेधून रोहित पवार यांनी त्यांना सडेतोड प्रश्न विचारले.

रोहित पवार यांचे विमान मालकाला ५ प्रश्न

-स्थानिकांच्या प्रतिक्रिया तसेच समोर असलेले CCTV फुटेज बघता कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा असून यांत्रिक बिघाडच झाला असावा असे वाटते
-विमानाला काय बिघाड झाला होता? Mechanical failure झाले असेल का?
-टेक-ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले नव्हते का? तपासणी करणारे कर्मचारी कोण होते?
advertisement
-विमानाचा Techlog कुठे आहे? विमानाचा Airworthy Report कुठे आहे?
-विमानाचे नियमित मेटेनन्स झाला नव्हता का? कोणी केला होता ?
-विमानाचा Heavy Maintenance कधी झाला होता? त्याचा रिपोर्ट ?

...तर सगळे मॅनेज केले जाईल, रोहित पवार यांना भीती

विमानाचे व्यवस्थित तपासणी झाली होती का, तपासणी करणाऱ्या कंपनीला पकडले पाहिजे, त्यांना विचारले पाहिजे. आम्ही काही सरकारमध्ये नाही, टेकलॅाग सुद्धा शोधावे लागणार आहे. रूटीन मेंटेनेन्स झाले होते का? जिथे खासगी विमाने ठेवली जातात तिथे खूप सीसीटीव्ही होते.
advertisement
१३-१४ दिवसात सरकारने फक्त सीसीटीव्ही गोळा केले आहे. पण बाकी काही केले नाही. चौकशीसुद्धा केली नाही. जर असाच उशीर केला तर सगळे मॅनेज केले जाईल, अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर विमान मालक सिंग यांनी विमान तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे सांगत तांत्रिक बिघाड नाकारला. त्यांनी या अपघाताचे कारण खराब दृश्यमानता किंवा पायलटने लँडिंग करताना केलेली चूक असू शकते, असे म्हटले.
advertisement

अजित पवार यांचे अपघाती निधन

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता अजित पवार हे मुंबईहून बारामतीला निघाले होते. बारामती विमानतळापासून पाचशे मीटर अंतरावर असतानाच त्यांच्या विमानाचा अपघात झाला. सुरुवातीला धावपट्टीवर विमान उतरविण्याचा वैमानिकाने प्रयत्न केला. मात्र पहिल्या प्रयत्नात यश न आल्याने दुसऱ्यांदा लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातात वैमानिक, सहवैमानिक, विमानातील सहाय्यक कर्मचारी, अजित पवार यांचे मुख्य सुरक्षारक्षकांना जीव गमवावा लागला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचा घात की अपघात? रोहित पवार यांनी विमान कंपनीच्या मालकाचा दावा खोडला, ५ रोखठोक सवाल विचारले
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement