जिद्द असावी तर अशी, न बोलताही फुलतोय व्यवसाय, दादरमधील बॅगवाले काकांची कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
या स्टॉलची ओळख केवळ स्वस्त दरातील आकर्षक बॅग्स नव्हे तर त्यामागे उभ्या असलेल्या मुकेश अग्रवाल काकांच्या अविरत जिद्दीची आहे.
मुंबई : दादर परिसरातील टिळक ब्रिजजवळ, कोतवाल उद्यान बस स्टॉपच्या मागे गेल्या चार-पाच वर्षांपासून एक छोटासा पण अत्यंत लोकप्रिय बॅग आणि पर्सचा स्टॉल लक्ष वेधून घेतो. या स्टॉलची ओळख केवळ स्वस्त दरातील आकर्षक बॅग्स नव्हे तर त्यामागे उभ्या असलेल्या मुकेश अग्रवाल काकांच्या अविरत जिद्दीची आहे. पॅरालिसिसमुळे काकांना बोलता येत नाही तरीही रोज सकाळी वेळेवर स्टॉल लावून ते स्वाभिमानाने आपली उपजीविका करताना दिसतात.
ग्राहकांशी बोलता येत नसल्याने ते एक अनोखी पद्धत वापरतात. हातात नेहमी असलेल्या कॅल्क्युलेटरवर ते संबंधित वस्तूची किंमत टाइप करून ग्राहकांना दाखवतात. या पद्धतीमुळे ग्राहकांशी संवाद अधिक सोपा आणि स्पष्ट होतो. स्टॉलवर उपलब्ध असलेल्या बॅग्सची विविधता हा या स्टॉलचा आणखी एक आकर्षणबिंदू आहे. येथे टोट बॅग्स, साइड बॅग्स, स्लिंग बॅग्स, वॉलेट्स, मिनी पाऊचेस यांसह विविध प्रकारच्या पर्स अत्यंत परवडणाऱ्या दरात मिळतात. किंमत केवळ 100 रुपयांपासून सुरू होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही सहज खरेदी करता येते.
advertisement
टोट बॅग्स साधारण 180 रुपयांना मिळतात आणि त्यात 4-5 रंगांची उपलब्धता असते. प्युअर हिमालयन कॉटनची दर्जेदार लॅपटॉप बॅग फक्त 300 रुपयांमध्ये उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि ऑफिसगोअर्समध्ये ती खूप लोकप्रिय आहे. साइड बॅग्सही 150 ते 200 रुपयांच्या दरात मिळतात तर स्लिंग बॅग्स आणि युनिक वॉलेट्सही काकांच्या स्टॉलची खासियत आहे.
advertisement
स्वतःच्या मर्यादांवर मात करत प्रामाणिकपणे आणि न खचता जगण्याचा धडा देणारी ही त्यांची जीवनकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. दादरच्या मध्यवर्ती भागात दररोज उभा राहणारा हा छोटासा स्टॉल केवळ बॅग्स विकण्याचे ठिकाण नसून संघर्ष, स्वाभिमान आणि मेहनतीचे प्रतीक बनले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 3:34 PM IST






