TRENDING:

दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यानं केली अमेरिकन फळाची लागवड; 150 झाडांपासून आता लाखोंची कमाई

Last Updated:
या शेतकऱ्यानं अमेरिकन फळाची शेती केली असून त्यामधून लाखोंची कमाई केलीय.
advertisement
1/5
दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यानं केली अमेरिकन फळाची लागवड; आता लाखोंची कमाई
शेतीमध्ये नफा मिळवायचा असेल तर लागवडीची, पिकांची पद्धत ही बदलली पाहिजे. शेतीचा पॅटर्न बदलला तर नफा मिळतो, हे यापूर्वीही सिद्ध झालंय.<a href="https://news18marathi.com/maharashtra/beed/"> बीड</a> सारख्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनीही आता शेतीत प्रयोग सुरू केलेत. येथील या शेतकऱ्यानं अमेरिकन फळाची शेती केली असून त्यामधून लाखोंची कमाई केलीय.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यातल्या शिवनी या गावातले प्रगतीशील शेतकरी परमेश्वर थोरात हे त्यांच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी यावेळी एक नवा प्रयोग केलाय. अमेरिकेतल्या मॅक्सिमा विद्यापीठानं विकसित केलेल्या एवोकोडा या फळाची लागवड त्यांनी शेतीत केलीय. हे फळ आता काढणीला आलंय. या फळाच्या विक्रीतून त्यांनी लाखोंची कमाई केलीय.
advertisement
3/5
परमेश्वर यांनी पहिल्यांदा बंगळुरच्या हरी आली विद्यापीठातून 2018 साली या फळाची 5 रोपं आणली होती. त्यांनी या रोपाची नंतर कलमं तयार केली. ही कलमं तयार झाल्यावर जवळपास दीड एकर क्षेत्रावर 150 झाडांची लागवड त्यांनी केली. त्यावेळी बीडमधील वातावरणात हे फळ वाढेल का ही त्यांना शंका होती.
advertisement
4/5
सुदैवानं परमेश्वर यांच्या मेहनतीला यश आलं. महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्यांच्या शेतात हे फळ उगवलं. शहरातील लहान-मोठे व्यापारी तसंच मॉलमध्येही या फळालाही मागणी आहे.
advertisement
5/5
एवोकोडा फळाच्या लागवडीसाठी त्यांना वर्षभरात 30 हजार खर्च आलाय. सध्या या फळाला 700 ते 800 रुपये प्रती किलो दर मिळतोय. त्यामुळे त्यांना यामधून पाच ते सहा लाखांचं उत्पन्न मिळतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यानं केली अमेरिकन फळाची लागवड; 150 झाडांपासून आता लाखोंची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल