TRENDING:

निवृत्त शिक्षकाची किमया, चक्क पुण्यात पिकवलं हिमालयातील फळ

Last Updated:
सफरचंद म्हंटल की सगळ्यांना जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश आठवतं. पण आता हेच सफरचंद पुण्यात पिकतंय.
advertisement
1/7
निवृत्त शिक्षकाची किमया, चक्क पुण्यात पिकवलं हिमालयातील फळ
सध्याच्या काळात शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. सफरचंद म्हंटल की सगळ्यांना जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश आठवतं. पण आता हेच सफरचंद <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातील</a> इंदापूर तालुक्यात पिकतंय. सणसर येथील शेतकरी प्रभाकर खरात यांनी सफरचंदाची शेती केलीय.
advertisement
2/7
प्रभाकर खरात हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सेवा निवृत्त झाल्यापासून ते शेती करतात. आपल्या शेतीत एक वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय खरात यांनी घेतला. यासाठी त्यांनी दार्जिलिंगमधून सफरचंदाची रोपे मागवली. या रोपांची लागवड करुन अवघ्या 15 ते 19 महिन्यात त्यांनी सफरचंदाचे पहिले उत्पादन यशस्वीपणे काढले.
advertisement
3/7
प्रभाकर यांचा मुलगा किशोर हे फिरण्यासाठी जम्मू काश्मीरला गेले होते. तेव्हा त्यांनी तिकडे सफरचांदाच्या बागा पाहिल्या. त्यानंतर त्यांनी या विषयी सविस्तर माहिती घेतली. वातावरण, औषधं आणि त्याची लागवड कशी करावी या विषयी माहिती घेतली. तसेच आपले वडील प्रभाकर खरात व भाऊ कालिदास खरात यांना सांगितली.
advertisement
4/7
त्यानंतर खरात कुटुंबीयांनी सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेऊन दार्जिंलिंग येथून रोपं मागवली. त्यांनी 10 गुंठे जागेत सफरचंदाची लागवड केली. त्यानंतर ही त्यांना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागली. त्यांचे सर्व कुटुंब मिळून शेतीत काम करतात.
advertisement
5/7
पहिल्यांदा खरात यांनी सफरचंदाचा 10 गुठ्यांतील प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे सर्वत्र या शेतीची चर्चा होत आहे. नंतर त्यांनी पुन्हा 10 गुंठे सफरचंदाची लागवड केली. गेल्या 4 वर्षांपासून ते सफरचंदाची शेती करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या फळ बागेसाठी कुठल्याही रासायनिक औषधांचा आणि खतांचा वापर केला नाही.
advertisement
6/7
प्रभाकर खरात सांगतात की, या शेतीमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागते. तसेच ही शेती करत असताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. वातावरण थंड हवेचं ठिकाण हवं. कारण त्यामुळे त्याच्या उत्पादनावर होणार नाही.
advertisement
7/7
जम्मू-काश्मीर सोडून इतर ठिकाणी सफरचंदाची शेती करता येते. हेच निवृत्त शिक्षक असणाऱ्या प्रभाकर खरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
निवृत्त शिक्षकाची किमया, चक्क पुण्यात पिकवलं हिमालयातील फळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल