TRENDING:

महाराष्ट्रातील या गावाची कमाल, पानांच्या शेतीतून शेतकरी मालामाल, पाहा PHOTOS

Last Updated:
महाराष्ट्रातील एका गावानं तोट्यात जाणाऱ्या शेतीवर रामबाण उपाय शोधला आहे. संपूर्ण गावच हमखास उत्पन्न देणारी शेती करतंय.
advertisement
1/9
महाराष्ट्रातील या गावाची कमाल, पानांच्या शेतीतून शेतकरी मालामाल, पाहा PHOTOS
आजकाल शेती परवडत नाही, घातलेला खर्चही निघत नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची व्यथा असते. पण या सर्व समस्येवर एका गावानं फार वर्षांपूर्वी एक उपाय शोधला आहे.
advertisement
2/9
सांगली जिल्ह्यातील बेडग येथे पिढ्यानपिढ्या पानमळ्यांची शेती केली जातेय. खाऊच्या पानांची शेती करणारा शेतकरी समाधानी असून लखपती झाल्याचे दुर्मिळ चित्र गावात दिसते.
advertisement
3/9
भारतात खाऊच्या पानांना प्रचंड मागणी असते. एकतर खाण्यासाठी त्याचा देशभर वापर होतोच, पण त्याचबरोबर खाऊच्या पानांना धार्मिक महत्त्व ही आहे. भारतातील कोणताही धार्मिक विधी खाऊच्या पानाशिवाय संपन्न होत नाही.
advertisement
4/9
खाऊच्या पानांच्या शेतीचे महत्त्व सांगली जिल्ह्यातील बेडग गावच्या शेतकऱ्यांनी आधीच ओळखले होते. म्हणून या गावात बहुसंख्य शेतकरी हे खाऊच्या पानमळ्यांची शेती करतात.
advertisement
5/9
खाऊचे पान म्हणजे नागवेलीचे पान होय. या पानांचे अनेक औषधी उपयोग ही आहेत. अनेकदा वैद्यांकडून आयुर्वेदिक औषधेही खाऊच्या पानातून घ्यायला सांगितली जातात. त्यामुळे या पानांना व्यावसायिक दृष्ट्या महत्त्व आहे.
advertisement
6/9
पानमळ्याची शेती ही दुग्धव्यवसायाप्रमाणे आहे. खाऊच्या पानांची तोडणी रोजच्या रोज करावी लागते. त्यामुळे पानमळा हा रोज उत्पन्न देणारा आहे. योग्य काळजी घेतल्यास पानमळ्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळते.
advertisement
7/9
पानमळ्याची शेती करताना नागवेलीसोबत इतर आंतरपिके घेता येतात. कारण ही नागवेलीची पाने फाटू नयेत, ऊन लागून पिवळी पडू नयेत म्हणून या मळ्यांना गर्द झाडांचे कुंपण घातलेले असते.
advertisement
8/9
ही झाडे शक्यतो शेवगा, लवंगी मिरची अशा प्रकारची असतात. त्यामुळे नागवेली उंच वाढून तिची पाने पुरेशी पक्व होईपर्यंत शेवग्याच्या शेंगांचे उत्पन्न मिळवता येते आणि शेतकऱ्यांचा दुहेरी नफा होतो.
advertisement
9/9
सांगलीतील पानांना संपूर्ण भारतात मोठी मागणी असते. प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या भागात या गावच्या पानांची निर्यात होते. त्यामुळे या शेतीतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
महाराष्ट्रातील या गावाची कमाल, पानांच्या शेतीतून शेतकरी मालामाल, पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल