महाराष्ट्रात फोडणी महागली, लसूण खातोय भाव, किलोला 325 रुपयांचा दर
- Published by:News18 Marathi
Last Updated:
राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला विक्रमी भाव मिळत आहे.
advertisement
1/7

सर्वसामान्यांच्या भाजीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची महाराष्ट्रात टंचाई निर्माण झालीय. त्यामुळे भाजीला लागणाऱ्या लसणाची फोडणी आता महागली आहे.
advertisement
2/7
<a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबई</a> बाजार सिमतीमध्ये सोमवारी 149 टन लसणाची आवक झाली. त्यामुळे मुंबई बाजार सिमतीमध्ये 110 ते 180 रुपये अशा किलो दराने लसणाची विक्री होत आहे.
advertisement
3/7
त्याचबरोबर पुण्याच्या होलसेल बाजारात हेच दर 100 ते 270 रुपयांवर आहेत. किरकोळ बाजारात लसणाची किंमत 250 ते 325 रुपयांवर पोहोचली आहे.
advertisement
4/7
यंदा लसणाचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात लसणाची किंमत वाढत चालली आहे. ही महागाई पुढे महिनाभर असणार आहे.
advertisement
5/7
भारतात लसणाचे सर्वात जास्त उत्पादन राजस्थान, गुजरात, ओडिशा, पंजाब, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये होते.
advertisement
6/7
महाराष्ट्रात जळगाव, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर परिसरात लसणाचे उत्पादन केले जाते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो.
advertisement
7/7
राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला विक्रमी भाव मिळत आहे. लसणाचे नव्याने उत्पादन सुरू होईपर्यंत दरवाढ कायम राहणार आहे.