ही म्हैस देईल तुम्हाला महिन्याभराचा पगार, नेमका कसा होईल फायदा, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पशुपालन हा शेतीसोबत एक कमाईचा चांगला स्त्रोत आहे. यामध्ये जर चांगल्या जातीची गाय, म्हैस पाळली तर चांगले उत्पन्न होऊ शकते. गायींमध्ये गिर आणि काकरेजी सारख्या जातीच्या गायी चांगल्या दूध उत्पादनासाठी ओळखल्या जातात. तसेच म्हशींमध्ये जाफराबादी आणि मेहसानी जातीच्या म्हशी खूप जास्त दूध देतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेऊयात, जे पशुपालनातून चांगले उत्पन्न कमावत आहेत. (भावनगर, गुजरात, प्रतिनिधी)
advertisement
1/7

पशुपालक विपुलभाई नंदारामभाई पंड्या असे या व्यक्तीचे नाव आहे. तलाजा तालुक्यातील वेलावदर गावातील रहिवासी आहे. त्यांच्याजवळ जाफराबादी जातीच्या म्हैस आहे.
advertisement
2/7
यामुळे त्यांना चांगला फायदा होत आहे. विपुलभाई यांनी जाफराबादी म्हशीच्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळवत आहेत. पिपरला येथून ही म्हैस आणली गेली आहे.
advertisement
3/7
ही म्हैस दररोज 20 ते 22 लीटर दूध देते. यामध्ये प्रती लीटर दूध 60 ते 70 रुपयांना विकले जात आहे.
advertisement
4/7
पशुपालक विपुलभाई नंदारामभाई पंड्या यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, “माझ्याजवळ एक जाफराबादी जातीची म्हैस आहे. पिपरला येथील माझे मामा यांच्याकडून मी ही म्हैस घेतली होती. ही म्हैस एकावेळी 10 ते 11 लीटर तर एका दिवसात 20 ते 22 लीटर दूध देते.”
advertisement
5/7
जाफराबादी म्हशीला तिची उंची, शिंगे आणि शरीराची रचना यावरून ओळखले जाते. इतर म्हशींच्या तुलनेत जाफराबादी जातीची म्हैस जास्त उंच असते. तसेच तिची शिंगेही लांब आणि शरीर मजबूत आणि मोठे असते.
advertisement
6/7
विपुलभाई पंड्या यांच्याकडे असलेल्या जाफराबादी जातीच्या म्हशीची किंमत अडीच लाख रुपये आहे. त्यांची चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. म्हशींना नियमित रुपाने मिनरल्स आणि कॅल्शियम दिले जाते.
advertisement
7/7
या म्हशीच्या दुधाचा दर 60 ते 70 रुपये प्रतिलीटर असल्यास दैनंदिन उत्पन्न 1200 ते 1500 रुपये होऊ शकते. त्यामुळे मासिक उत्पन्न सुमारे 45 हजार रुपये आहेत. तर खर्चही सुमारे 50% पर्यंत येतो.