TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्राला पुढील 4 दिवस धोक्याचे! हवामान विभागाचा रेड अलर्ट

Last Updated:
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे सावट कायम राहणार आहे.
advertisement
1/7
Weather Alert: महाराष्ट्राला पुढील 4 दिवस धोक्याचे! हवामान विभागाचा रेड अलर्ट
आज सकाळपासूनच राज्यभर मुसळधार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता अधिक असून नांदेडमध्ये पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
2/7
त्याचबरोबर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे सावट कायम राहणार आहे. पाहुयात 19 ऑगस्ट रोजी हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 26 आणि 24 अंश सेल्सिअस असेल. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/7
नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसराला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली वगळता इतर सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
6/7
मराठवाड्यात धाराशिव वगळता छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि बीड या सातही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात 19 ऑगस्ट रोजी देखील अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भात गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व 10 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्राला पुढील 4 दिवस धोक्याचे! हवामान विभागाचा रेड अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल