TRENDING:

बाणेर-शिवाजीनगर गाठा सुसाट! दुमजली उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला, मुहूर्त कधी?

Last Updated:

Double Decker Flyover Latest News : पुणे शहरातील एक महत्त्वाचा उड्डाणपूल सुरु होण्याची तारीख जवळच आलेली आहे. या पुलामुळे सर्वात महत्त्वाच्या परिसरातील अंतर काही मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्यात सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा मार्ग लवकर वाहतूकीसाठी खुला होणार आहे.
PMRDA Pune University Chowk project update
PMRDA Pune University Chowk project update
advertisement

बाणेर रॅम्पच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण

मिळालेल्या माहितीनुसार,एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या बाणेरकडील रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा रॅम्प या आठवड्याच्या शेवटी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे बाणेरहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा फायदा होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होईल आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

पीएमआरडीए यांच्या माहितीनुसार या प्रकल्पाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या फक्त दिशादर्शक फलक बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल आणि त्यानंतर रॅम्प वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल.

advertisement

विद्यापीठ चौकात वाहतूक सुसाट

यापूर्वी औंध ते शिवाजीनगर मार्गिका ऑगस्ट 2025 मध्ये सुरू झाली होती. आता बाणेर रॅम्प सुरू झाल्यानंतर विद्यापीठ चौकातील सुमारे 50 टक्के वाहतूक ताण कमी होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे.

पाषाण बाजूचा रॅम्प उघडण्यासाठी किती महिने लागणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

मात्र पाषाणकडील रॅम्पसाठी नागरिकांना अजून दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या भागातील कामाला उशीर झाला आहे. ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बाणेर-शिवाजीनगर गाठा सुसाट! दुमजली उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला, मुहूर्त कधी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल