TRENDING:

बाणेरमधील 'स्पर्श व्हिला'मध्ये 26 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं? दुर्गाच्या मृत्यूनंतर अखेर 13 दिवसांनी भावाचा धक्कादायक खुलासा

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेर परिसरातील 'स्पर्श व्हिला' सोसायटीतून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. २० वर्षीय दुर्गा घीसाराम चौधरी या तरुणीने राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली. वरवर ही साधी आत्महत्या वाटत असली तरी, हे प्रकरण भयंकर आहे. ज्या घरात दुर्गाचा अंत झाला, त्याच घरात काही वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या बहिणीचाही असाच संशयास्पद मृत्यू झाल्याचंही नुकतंच समोर आलं होतं .
तरुणीच्या मृत्यू प्रकरणात अपडेट (AI Image)
तरुणीच्या मृत्यू प्रकरणात अपडेट (AI Image)
advertisement

21 महिने अन् नरकयातना

दुर्गा आणि तिचा भाऊ दीपक हे गेल्या २१ महिन्यांपासून त्यांचे मामा चुनिलाल रामलाल चौधरी यांच्याकडे वास्तव्यास होते. दीपक बाणेरमध्ये तर दुर्गा म्हाळुंगे येथील मेडिकलमध्ये काम करत असे. मात्र, या 'व्हिला'च्या चार भिंतींच्या आत दुर्गाला शारीरिक आणि मानसिक नरकयातना दिल्या जात होत्या. किरकोळ कारणावरून मारहाण करणे आणि आई-वडिलांना काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देणे, असा मामा-मामीचा क्रूर सिलसिला सुरू होता. २५ जानेवारी रोजी झालेल्या भीषण मारहाणीनंतर दुर्गाचा संयम सुटला आणि २६ जानेवारीच्या रात्री तिने टोकाचे पाऊल उचलले.

advertisement

मामा-मामीवर गुन्हा दाखल

बहिणीच्या अंत्यविधीसाठी राजस्थानला गेलेल्या दीपकने पुण्यात परतताच मामा चुनिलाल चौधरी (४५) आणि मामी हंजा चौधरी (४०) यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यश अन् श्रुतीनं डोकं लावलं, चायनिज भेळ खायला मुंबईकरांच्या रांगा, का आहे खास? Vi
सर्व पहा

या घटनेला १० पेक्षा जास्त दिवस उलटूनही एफआयआर (FIR) नोंदवण्यात न आल्याने रविवारीच नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला होता. नागरिक रस्त्यावरही उतरले होते. यानंतर आता प्रकरणात हन्हा दाखल झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बाणेरमधील 'स्पर्श व्हिला'मध्ये 26 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं? दुर्गाच्या मृत्यूनंतर अखेर 13 दिवसांनी भावाचा धक्कादायक खुलासा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल