सिंधुदुर्ग : कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा. नवसाला पावणारी देवी म्हणून भराडी मातेची ख्याती आहे. दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरविली जाते. त्यामुळे यंदा आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याच प्रमाणे जाहीर झाली आहे. यंदाही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.
कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरवली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश परदेशात कोकणातील या एका जत्रेचे आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीचा जत्रा रंगते मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीचे यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेतेही या यात्रेत सहभागी होतात.
advertisement
3 जन्मतारखांवर चालते सुखकारक शुक्राची सत्ता, 2025 वर्षात प्रेमविवाह होण्याची शक्यता, पण...
आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा येत्या 22 फेब्रुवारीला होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसूर हे एक गाव आहे. गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत भराडी देवी विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचे नाव भराडी देवी असं ठेवण्यात आला आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसरात माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं. ऊसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती असल्याने देवीच दर्शन सर्वांसाठी खुले असते.
भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाण आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीला दर्शन घेतात. दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडीदेवीचे दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबीयांच्या माहेरवाशीने तो अबोल राहून करतात. देवीचा हुकुम घेऊन सदर तारीख जत्रेची निश्चित केली जाते.