TRENDING:

टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार ओपनर अभिषेक शर्मा तडकाफडकी रुग्णालयात दाखल, कारण काय?

Last Updated:

ICC T20 World Cup मध्ये टीम इंडियाचा स्टार ओपनर अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल, आगामी सामन्यात खेळण्याबाबत अनिश्चितता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अंडर 19 चा वर्ल्डकप हाती आला, त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 12 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधीच स्टार ओपनरला रुग्णालयात तडकाफडकी दाखल करावं लागलं आहे. ICC T20 World Cup मध्ये टीम इंडिया आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी सज्ज झाली असतानाच, टीम इंडियाचा स्टार ओपनर अभिषेक शर्माची तब्येत बिघडली.
News18
News18
advertisement

अचानक काय झालं?

7 फेब्रुवारी रोजी पहिला सामना खेळून आल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. अभिषेकला अचानक ताप येऊ लागला. पोटाचा संसर्गामुळे अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती टीम इंडियाकडून देण्यात आली आहे. आगामी सामन्यांमध्ये तो खेळू शकेल की नाही याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहे.

कधी बिघडली तब्येत

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वीच अभिषेकची तब्येत बिघडली होती. ७ फेब्रुवारी रोजी वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात खेळल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावली. मुंबईत असताना त्याला प्रचंड ताप भरला, त्यामुळे त्याला तातडीने ड्रिप्स द्याव्या लागल्या. आता हा संसर्ग बळावल्याने त्याला दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आलं.

advertisement

T20 World Cup : 6,6,4... पुण्याच्या शुभमने आफ्रिदीची पिसं काढली, महाराष्ट्राचा वाघ पाकिस्तानला एकटा नडला!

सराव सामन्याला दांडी

मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडियाचा पहिला सराव सामना झाला, या सामन्याला अभिषेक तिथे दिसला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला बीसीसीआयकडून पोट बिघडल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात त्याला गंभीर संसर्ग झाल्याचं समोर आलं. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "अभिषेकला अजूनही पोटाचा त्रास जाणवतोय. येत्या दोन दिवसांत तो बरा होऊन निवडीसाठी उपलब्ध होईल, अशी आम्हाला आशा आहे."

advertisement

T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अडचणीत, एक जण आजारी, दोघांना डच्चू, प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार 3 बदल!

नामबियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

१५ फेब्रुवारीला नामबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अभिषेक शर्मा उपलब्ध असेल की नाही, याबाबत साशंकता आहे. ओपनर बॅट्समन म्हणून अभिषेकची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, अशा वेळी तो संघात नसणे हा टीम इंडियासमोर मोठा पेच ठरू शकतो. सध्या अभिषेक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार ओपनर अभिषेक शर्मा तडकाफडकी रुग्णालयात दाखल, कारण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल