TRENDING:

'भारतीय खेळाडूंची बॅट...', स्पेशल वस्तूवरून सनसनाटी, T20 वर्ल्ड कपमध्ये नवा ड्रामा!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप सुरू असताना भारतीय खेळाडूंच्या बॅटवर सनसनाटी आरोप करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यापासून टीम इंडियाचा एकाही टी-20 आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये पराभव झालेला नाही. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधल्या पहिल्या सामन्यात युएसएविरुद्धही टीम इंडियाचा विजय झाला होता. मागच्या दोन वर्षांमध्ये टीम इंडियाने केलेल्या पॉवर हिटिंगची चर्चा जगभरात आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग या खेळाडूंनी आक्रमक बॅटिंग करून विरोधी टीमच्या बॉलरना घाम फोडला, ज्यामुळे बहुतेक सामन्यांमध्ये टीम इंडियाने 200 पेक्षा जास्त रन अगदी सहज केल्या.
'भारतीय खेळाडूंची बॅट...', स्पेशल वस्तूवरून सनसनाटी, T20 वर्ल्ड कपमध्ये नवा ड्रामा!
'भारतीय खेळाडूंची बॅट...', स्पेशल वस्तूवरून सनसनाटी, T20 वर्ल्ड कपमध्ये नवा ड्रामा!
advertisement

टीम इंडियाच्या या पॉवर हिटिंगवर श्रीलंकेच्या खेळाडूने आरोप केला आहे. भारतीय खेळाडू विशेष बॅट वापरत असल्याचा आरोप श्रीलंकेचा बॅटर भानुका राजपक्षे याने केला आहे. भारतीय खेळाडू जी बॅट वापरत आहेत, त्यातून जास्त शक्ती निर्माण होत असल्याचं भानुका राजपक्षे म्हणाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने आयर्लंडवर 20 रननी विजय मिळवला, त्यानंतर भानुका राजपक्षेने हे आरोप केले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार बॅट या फक्त लाकडापासून बनवल्या गेल्या पाहिजेत. दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या बॅट या वापरता येत नाहीत. आयसीसीच्या सामन्यांमध्ये बॅटचा आकार आणि बॅट बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्याचा मर्यादांचं कठोर पालन करणं बंधनकारक असतं. बॅटची पॉवर वाढवणाऱ्या वस्तू बॅटमध्ये लावल्या तर ते आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन ठरतं. प्रत्येक सामन्याआधी आयसीसी खेळाडूंच्या बॅटची तपासणी करते.

advertisement

काय म्हणाला भानुका राजपक्षे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

'भारतीय खेळाडूंकडे अशा बॅट आहेत ज्या आपल्याला मिळणाऱ्या सर्वोत्तम बॅटपेक्षा खूपच चांगल्या दर्जाच्या आहेत. या बॅटवर रबराचा थर लावला गेला आहे, असं वाटतं. हे कसं शक्य आहे मला माहिती नाही. इतर खेळाडू या बॅट विकत घेऊ शकत नाहीत, आणि हे सगळ्या खेळाडूंना माहिती आहे. भारतीय खेळाडू जास्त पॉवर निर्माण करणाऱ्या बॅट वापरतात', असं भानुका राजपक्षे म्हणाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'भारतीय खेळाडूंची बॅट...', स्पेशल वस्तूवरून सनसनाटी, T20 वर्ल्ड कपमध्ये नवा ड्रामा!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल