या सामन्यामध्ये गोव्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण त्यांना हा निर्णय चांगलाच महागात पडला. चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या सरफराज खानने 75 बॉलमध्ये 157 रनची वादळी खेळी केली, ज्यात 9 फोर आणि 14 सिक्सचा समावेश होता. सरफराजने तब्बल 209.33 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. सरफराजशिवाय त्याचा भाऊ मुशीर खानने 60 रनचं योगदान दिलं, तर हार्दिक तमोरेने 28 बॉलमध्ये 53 रन केले. विषबाधेनंतर पुनरागमन करणाऱ्या यशस्वी जयस्वालने 46 रनची खेळी केली.
advertisement
मुंबईच्या बॅटरनी अर्जुन तेंडुलकरच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. अर्जुनच्या 8 ओव्हरमध्ये मुंबईने तब्बल 78 रन काढले. अर्जुनला या सामन्यात एकही विकेट घेण्यात यश आलं नाही.
मुंबईच्या 445 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी गोव्याकडून अर्जुन तेंडुलकर आणि कश्यप बखेले ओपनिंगला आले, पण अर्जुन 27 बॉल 24 आणि कश्यप 24 बॉलमध्ये 21 रन करून आऊट झाले. सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या अभिनव तेजराणाने 70 बॉलमध्ये 100 रनची खेळी केली, तर ललित यादवने 64 आणि दीपराज गावनकरने 28 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली. मुंबईकडून कर्णधार शार्दुल ठाकूरने 6 ओव्हरमध्ये फक्त 20 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर यशस्वी जयस्वालला 2 विकेट मिळाल्या. तुषार देशपांडे, सिलव्हेस्टर डिसोझा आणि मुशीर खान यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
