पालघर: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनामुळे हवाई वाहतुकीच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. अशातच मुंबईजवळील पालघरमध्ये एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग हे शाळेच्या मैदानात करण्यात आलं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये ४ प्रवाशी सुखरूप बचावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पालघरच्या केळवे रोड परिसरात हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
advertisement
पायलटच्या प्रसंगावधानामुळे हेलिकॉप्टरमधील चारही जण सुखरूप बचावले आहे. हे हेलिकॉप्टर जुहू विमानतळावरून सुरतकडे निघालं होतं. पण मध्येच हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे हेलिकॉप्टरला केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
या हेलिकॉप्टरमध्ये एक जुनियर पायलट, एक सीनियर पायलट आणि एक इंजिनियरसह एक आणखी इसम असल्याची माहिती समोर आली आहे. दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. सुदैवाने या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये कोणतीही हानी झाली. या हेलिकॉप्टरमध्ये नेमका काय बिघाड झाला होता आणि प्रवाशी कोण होते, याची माहिती अद्याप समोर आली आहे.
राजकीय नेते आणि व्हीआयपींच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाडाच्या घटना
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्या आणि जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली होती. उड्डाण करण्याआधीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्या बाब समोर आली होती. त्यानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला होता. तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे लातूरच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी विमानात बिघाड झाल्यामुळे रस्ते मार्गे प्रवास करावा लागला होता. एकीकडे राजकीय आणि व्हीआयपी नेत्यांच्या हेलिकॉप्टर आणि विमानात बिघाड झाल्याची घटना घडत असताना पालघरमध्ये चक्क हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग शाळेच्या मैदानात करण्यात आल्यामुळे हवाई वाहतूक सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.
