कधी एकेकाळी 2000 पगार अन् आज सापडलं कोट्यवधीचं घबाड, पाहून अधिकारीही चक्रावले
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पैसा...पैसा...! नजर जाईल तिथून सापडल्या नोटा, सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी जे सापडलं ते पाहून अधिकाऱ्यांची उडाली झोप, घटनास्थळावरचे पाहा POHOTO
भ्रष्टाचाराची मुळं सरकारी व्यवस्थेत किती खोलवर रुजली आहेत, याचं एक विदारक चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. अतिरिक्त तहसीलदार जितेंद्र कुमार पांडा यांच्या विविध ठिकाणच्या घरांवर आणि कार्यालयावर ओडिशा विजिलेंस टीमने छापे टाकले. या कारवाईत बेहिशेबी मालमत्तेचा असा काही साठा सापडला की, अधिकाऱ्यांना पैशांची मोजणी करण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या.
advertisement
या छापेमारीतील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, पांडा यांनी ७५ लाख रुपयांची रोख रक्कम भुवनेश्वरमधील बडागडा येथील ब्रिट कॉलनीतील एका बंद घरात लपवून ठेवली होती. हे घर त्यांच्या सासूच्या मालकीचे आहे. त्यांची सासू सध्या आजारी असून ती पांडा यांच्यासोबतच राहते, याचा फायदा घेत त्यांनी सासरच्या बंद घराचा वापर 'बँकेसारखा' केला होता. एका लॉकरमध्ये तब्बल ७५ लाख रुपये रोख पाहून अधिकारीही चक्रावून गेले.
advertisement
जितेंद्र कुमार पांडा यांच्या कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर त्यांचे हे 'प्रगती'चे आलेख धक्कादायक आहेत. १० नोव्हेंबर १९९५ रोजी ते कटक येथील 'पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा' संचालनालयात वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून रुजू झाले होते. अनुकंपा तत्त्वावर त्यांना केवळ २,००० रुपये मासिक पगारावर नोकरी मिळाली होती.
advertisement
advertisement
advertisement
विजिलेंस टीमने दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियामधील त्यांचे एक लॉकर अद्याप उघडायचे बाकी आहे. या लॉकरमधून आणखी किती दागिने किंवा रोख रक्कम बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच त्यांच्या विविध बँक खात्यांमधील शिल्लक, पोस्टातील ठेवी आणि इतर गुंतवणुकीची कागदपत्रे तपासली जात आहेत. विजिलेंसच्या तांत्रिक शाखेकडून त्यांच्या सर्व इमारतींचे आणि जमिनींचे मूल्यांकन केले जात आहे.
advertisement
एका सामान्य पगारावर नोकरी सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे एवढी अफाट संपत्ती येतेच कशी? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. ही कारवाई अजूनही सुरू असून, जितेंद्र पांडा यांच्यावरील फास आता अधिक आवळला जाणार आहे. सरकारी खुर्चीचा वापर करून स्वतःच्या तिजोऱ्या भरणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्धच्या या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.







