नारळ पाणी पिण्याची पद्धत चुकत तर नाही ना?
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरही लोकांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात.
मात्र अनेकदा नारळ पाणी पिण्याची पद्धत चुकते त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होतं.
More
Stories
भररस्त्यात टॅंकरचा अपघात, पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी
आई मुलीच्या कानात बोलली असं काही…5 वर्ष कोमात गेलेली मुलगी लागली हसायला!
बऱ्याचदा नारळ पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे शरीराला हानी होते आणि एलर्जीही होऊ शकते.
औंषधांसोबत नारळ पाणी घेणं हानिकारक ठरु शकतं.
नारळ पाण्यात पोटॅशिअम असतं आणि काही औषधांसोबत घेतल्यामुळे शौचालयाची समस्या उद्भवू शकते.
त्यामुळे औषधे घेताना तुम्ही नारळ पाणी पित असाल तर त्याचं सेवन टाळा.
रेफ्रिजरेट केलेलं नारळ पाणी पिण टाळा.
काहींना नारळ पाण्याची एलर्जीही असते. मात्र हे दुर्मिळ असलं तरी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
नारळ पाणी पिल्यावर शरीराला खाज सुटत असेल किंवा पित्ताच्या गाठी उठत असतील तर लगेत डॉक्टरकडे जा.