Viral Video : भररस्त्यात टॅंकरचा अपघात, पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी

Last Updated:

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या घटना कायमच समोर येत असतात. कधी, कुठे, कसा अपघात घडेल सांगता येत नाही. दिवसेंदिवस अशा अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

भररस्त्यात टॅंकरचा अपघात
भररस्त्यात टॅंकरचा अपघात
नवी दिल्ली : रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या घटना कायमच समोर येत असतात. कधी, कुठे, कसा अपघात घडेल सांगता येत नाही. दिवसेंदिवस अशा अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. असाच एक अपघात घडल्याची घटना समोर आली. मात्र यावेळी लोकांनी जे केलं ते पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
लखनौमध्ये इंडियन ऑईल टॅंकरच्या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही पण अपघातानंतर लोकांनी जे केले ते धक्कादायक आहे. या अपघाताची माहिती मिळताच लोकांनी घरातून बादली, डब्बा घेऊन टॅंकरकडे धाव घेतली.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक टॅंकर उभा असलेला पहायला मिळतोय. त्याभोवती लोकांची भरपूर गर्दी आहे. टॅंकरमधून पेट्रोल, डिझेल काहीतरी असून ते खाली गळतंय. लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी भांडी आणून त्यामध्ये हे भरायला सुरुवात केली. काहींच्या हातात बाटली होती तर काहींनी बादली आणली होती. लोक टॅंकरमधून गळणाऱ्या तेलावर चांगलेच तुटून पडले आहेत.
advertisement
advertisement
चुकून थोडीशी ठिणगीही त्यात पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. लोक बिनधास्तपणे चोरी करुन पळत आहेत. Anas Ghazi नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ब्रिजवर मोठी गर्दीही पहायला मिळतेय. व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतायेत.
अपघातादरम्यान अशा चोरीच्या अनेक घटना समोर येत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : भररस्त्यात टॅंकरचा अपघात, पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement