नगरमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार, पाठलाग करत तरुणाला घातल्या गोळ्या, धडकी भरवणारा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Ahilyanagar: अहिल्यानगर शहरात मंगळवारी मध्यरात्री गोळीबाराचा राज चेंबर्स परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
अहिल्यानगर शहरात मंगळवारी मध्यरात्री गोळीबाराचा राज चेंबर्स परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जुन्या वादातून अबरार मुख्तार शेख या तरुणावर अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अबरार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अबरार शेख हा राज चेंबर्स परिसरात असताना ही घटना घडली. मुकुंदनगर परिसरातील एका तरुणाने त्याच्यावर अचानक गोळीबार केला. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अबरारला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
advertisement
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत अबरार आपल्या एका मित्रासोबत दुचाकीने जाताना दिसत आहे. याच वेळी हल्लेखोराने त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अबरारने जीव मुठीत घेऊन पळ काढला. पण हल्लेखोराने पाठलाग करत त्याला गोळ्या घातल्या. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नगरमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना, पाठलाग करून तरुणाला घातल्या गोळ्या pic.twitter.com/wZQT1RWuFJ
— News18 Marathi (@News18_marathi) February 12, 2026
advertisement
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 7:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार, पाठलाग करत तरुणाला घातल्या गोळ्या, धडकी भरवणारा CCTV VIDEO







