advertisement

ऑनलाइन माहिती मिळवली, सुरुवातीला कमी भांडवल गुंतवलं, कोल्हापूरचे दिलीप महिन्याला करताय 5 लाखांची कमाई

Last Updated:

Farmer Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील दिलीप कांबळे यांनी पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन उत्पन्नाचा एक वेगळा मार्ग निवडला.

Farmer Success Story
Farmer Success Story
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील दिलीप कांबळे यांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन उत्पन्नाचा एक वेगळा मार्ग निवडला आणि मोती शेतीतून दरमहा ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला. नोकरी सांभाळत त्यांनी सुरू केलेला व्यवसाय अडचणीचा ठरत होता. मात्र सातत्य, मेहनत आणि योग्य प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांनी आज निर्यात दर्जाचे मोती तयार करण्यापर्यंत मजल मारली आहे.
अपयशातूनच यशाची वाट सापडली
दिलीप कांबळे यांना २०१५ साली ऑनलाइन माध्यमातून मोती शेतीबाबत माहिती मिळाली. या क्षेत्रात महाराष्ट्रात फारच कमी लोक कार्यरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही संधी ओळखली. २०१६ मध्ये त्यांनी नागपूर येथे प्राथमिक प्रशिक्षण घेतले, मात्र अपूर्ण माहिती आणि अनुभवाअभावी सलग तीन वर्षे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही.
advertisement
ओडिशातील प्रशिक्षणाने बदलले भविष्य
अपयशानंतरही खचून न जाता कांबळे यांनी ओडिशातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर (CIFA) येथे सखोल प्रशिक्षण घेतले. योग्य तांत्रिक ज्ञान मिळाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये नव्या जोमाने पुन्हा सुरुवात केली. सुरुवातीला ५,००० ऑयस्टरपासून शेती सुरू करत त्यांनी पुढे १८,५०० ऑयस्टरपर्यंत प्रकल्प वाढवला आणि यश त्यांच्या पायाशी आले.
निर्यात दर्जाच्या मोत्यांनी दिले आर्थिक बळ
२०२१ हे वर्ष कांबळे यांच्या आयुष्यात निर्णायक ठरले. याच काळात त्यांना पहिला निर्यात दर्जाचा, आकर्षक आकाराचा मोती मिळाला. परदेशी बाजारात या मोत्यांना प्रचंड मागणी असून, एका मोत्यामागे ३०० ते ५०० रुपये दर मिळू लागला, जो देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा जवळपास तिप्पट होता. साधारण १०० रुपयांची गुंतवणूक करून ते थेट ३०० ते २,००० रुपयांपर्यंत कमाई करू लागले.
advertisement
स्वतःचे तलाव, स्वतःचा व्यवसाय
आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर कांबळे यांनी स्वतःचे तलाव उभारून उत्पादन वाढवले. आज ते विविध आकारांचे आणि उच्च प्रतीचे मोती तयार करतात, ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, निर्यातीसाठी मोती जागतिक दर्जाचे असणे अत्यावश्यक असल्याचे ते आवर्जून सांगतात.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण, देशभरात प्रकल्प
दिलीप कांबळे यांनी केवळ स्वतःपुरते यश मर्यादित न ठेवता इतरांनाही या व्यवसायाकडे वळवले आहे. २०१९ पासून आतापर्यंत त्यांनी सुमारे शेकडो शेतकऱ्यांना मोती शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या देशभरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मोती शेती प्रकल्प कार्यरत आहेत. निर्यातीमधून मिळणाऱ्या भरघोस नफ्यामुळे त्यांनी पूर्णपणे या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे.
advertisement
शेतकऱ्यांना सल्ला काय?
मोती शेती सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी कांबळे यांचा सल्ला स्पष्ट आहे. सुरुवातीचा खर्च फार मोठा नसतो, कमी भांडवलातही चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र, कोणताही प्रकल्प फसणार नाही यासाठी योग्य आणि अधिकृत प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
ऑनलाइन माहिती मिळवली, सुरुवातीला कमी भांडवल गुंतवलं, कोल्हापूरचे दिलीप महिन्याला करताय 5 लाखांची कमाई
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement