Bigg Boss Marathi 6 : टोळीत फुललं प्रेमाचं गुलाब! 'मला तो आवडतो...', रुचिता पडली विशालच्या प्रेमात? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 च्या घरात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात टोळीत फूट नाही तर प्रेमाचं गुलाब फुलताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात राखी सावंतची एन्ट्री होताच सगळीच समीकरणं बदलताना दिसत आहेत. घरात आल्यानंतर राखीने थेट विशालच्या टोळीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. विशाल आणि रुचिता एकत्र बसलेले असताना राखी त्यांच्या मध्ये जाऊन बसली आणि तिने थेट विशाललाच प्रश्न केला, "तू रुचिताचे पाय का चेपतोस? तुमच्यात काय सुरू आहे? तू माझा मित्र आहेस. इतकंच नाही तर राखीने विशालला रुचितापासून दूर राहण्याचा इशाराही दिला.
राखीच्या या बोलण्यामुळे रुचिता चांगलीच संतापली. कारण हा प्रश्न थेट तिच्या आणि विशालच्या नात्यावर आला. विशाल आणि राखी खूप चांगले मित्र आहेत. राखी आल्यापासून दोघं अनेकदा एकत्र दिसत आहेत. त्यामुळे रुचिताच्या मनात संभ्रम निर्माण झालेला दिसत आहे.
advertisement
अशातच घरात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात टोळीत फूट नाही तर प्रेमाचं गुलाब फुलताना दिसणार आहे. अनुश्री आणि रुचिता एकत्र बसून गप्पा मारत असताना अनुश्रीने थेट रुचिताला प्रश्न केला, "तुला काय फिलिंग्स आहेत विशालसाठी?" या प्रश्नावर मन मोकळं करत रुचिता म्हणाली, "मला त्याचा प्रेझेन्स आवडतो. संपूर्ण घर जेव्हा माझ्या फ्लॉसवर फोकस करतं तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करतो."
advertisement
advertisement
पुढे बोलताना रुचिता भावूक झाली आणि म्हणाली, “मी खूप अटॅच आहे. खूप खूप अटॅच आहे. कळतंच नाहीये मी काय करू.” रुचिताला भावूक झाल्याचं पाहून अनुश्रीने तिला समजावलं. "रडू नकोस, शांत हो", असं म्हणत तिने रुचिताला आधार दिला. बिग बॉसचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
आता रुचिता खरंच विशालच्या प्रेमात पडली आहे का? की हा सगळा गेमचा भाग आहे? बिग बॉसच्या घरात नाती कधी जुळतात तर कधी तुटतात. त्यामुळे रुचिता तिच्या भावना विशालसमोर व्यक्त करणार का? हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे आणि एपिसोड फार इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 1:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : टोळीत फुललं प्रेमाचं गुलाब! 'मला तो आवडतो...', रुचिता पडली विशालच्या प्रेमात? VIDEO








