अजित पवारांच्या अपघाताची चौकशी 'त्या' मोठ्या नेत्याने रोखून धरली, रोहित पवार यांचा नवा बॉम्ब
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rohit Pawar on Ajit Pawar Accident: अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, अशी दाट शंका रोहित पवार यांना आहे.
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला १५ दिवस झालेत. दादांचा तेरावा झाल्यावर अपघाताच्या अनुषंगाने सविस्तर बोलेन, असे त्यांचे पुतणे, आमदार रोहित पवार म्हटले होते. बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान मालक आणि विमान कंपनीच्या कारभारावर त्यांनी शंका उपस्थित केल्या. आजही राजधानी नवी दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवे दावे केले. बारामती अपघाताची चौकशी युरोपीयन एजन्सीला देण्यात येणार होती पण एक मोठ्या नेत्याने ही चौकशी रोखून धरली , असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांच्या आरोपानंतर तो मोठा नेता कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, अशी दाट शंका रोहित पवार यांना आहे. अपघाताची चौकशी सीआयडीद्वारे न करता डीजीसीएसह परदेशातील अनुभवी संस्थांकडून करावी, अशी त्यांची मागणी आहे. परंतु परदेशातील अनुभवी संस्थांकडून होणारी चौकशी एका मोठ्याच्या हस्तक्षेपामुळे थांबली, असे रोहित पवार म्हणाले.
तो पूर्व विदर्भातील नेता कोण?
advertisement
विमान कंपनीला युरोपात हवाई वाहतूक करण्यास बंदी घातलेली असताना भारतात परवानगी कशी दिली गेली. वैमानिक व्यसनी होता का, असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले. त्याचवेळी रोहित पवार यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगताना पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या भेटीमुळे अजित पवार यांना पुण्याकडे निघायला उशीर झाल्याचा मुद्दा आवर्जून सांगितला. तसेच त्यांना एका फाईलवर सही हवी होती. या घटनाक्रमाला वेळ लागल्यानेच अजित पवार यांना विमान प्रवास करावा लागल्याचे अधोरेखित करून 'त्या' पूर्व विदर्भातील नेत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला.
advertisement
रोहित पवार यांच्याकडून प्रश्नांच्या फैरी
अजित पवार यांचा विमान प्रवास ऐनवेळी ठरविण्यात आला. नियोजित वैमानिक न येता दुसऱ्या वैमानिकाला विमान उडविण्यास सांगण्यात आले. तसेच नियमित विमान न देता अन्य विमान त्यांच्या प्रवासाला देण्यात आले. ते विमान तांत्रिकदृष्ट्या ठीक होते का? त्याची नियमित तपासणी झाली होती का? असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले.
advertisement
रोहित पवार यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
रोहित पवार बोलले ते ऐकले नाही. त्यांनी प्रेझेंटेशन दिले आहे. त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या. अजितदादा वरिष्ठ नेते होते. त्यांच्या अपघाताप्रकरणी चौकशीची मागणी चुकीची नाही. सगळ्यात आधी केंद्राला पत्र लिहून मी चौकशीची मागणी केली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने चौकशी समिती लावली आहे. पण चौकशी पूर्ण होण्याआधी काही तर्क वितर्क लावणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 2:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांच्या अपघाताची चौकशी 'त्या' मोठ्या नेत्याने रोखून धरली, रोहित पवार यांचा नवा बॉम्ब







