advertisement

स्पीड, गाणी अन् वेग मस्तीनं घेतला 6 जिगरी मित्रांचा जीव, कारचा चक्काचूर अन् पत्रा कापून काढले मृतदेह

Last Updated:
जयपूर-आग्रा नॅशनल हायवेवर दौरा गावातील समय सिंह, लोकेश, दिलखुश, मनीष, अंकित, नवीन या सहा मित्रांचा अतिवेगात कार ट्रेलरवर आदळून भीषण मृत्यू झाला. गावात शोककळा.
1/7
मित्रांचा धिंगाणा, गाडी आणि सुस्साट वेगानं जाणारी कार, लग्नाहून परत येत असताना मस्ती नडली आणि काळानं झडप घातली. सुस्साट वेगानं कार पळवण्याच्या नादात नियंत्रण सुटलं आणि घात झाला. गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि कार थेट डिव्हायडर सोडून ट्रकवर जाऊन आदळली.

2/7
कारचा स्पीड इतका जास्त होता की ट्रकला बसलेल्या जबरदस्त धडकेत कारचा अक्षरश: चुराडा झाला, काहीच उरलं नाही इतकी भीषण अवस्था झाली. गाडीतल्या सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी कारचे पत्रे कापण्याची वेळ आली.

3/7
राजस्थानच्या दौरा इथे हा भीषण अपघात झाला. चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर पाचवा मित्राने रुग्णालयात दाखल करेपर्यंत मृत्यू झाला. सहाव्या मित्राला जयपूरमध्ये रेफर करण्यात आलं, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

4/7
मंगळवारी रात्री उशिरा सहा मित्र एका लग्न सोहळ्याहून घरी परतत असताना अतिवेगानं त्यांचा घात झाला. वेगानं कार चालवण्याच्या नादात नियंत्रण सुटलं आणि डिव्हायडर तोडून गाडी थेट ट्रेलरवर आदळली. जयपूर-आग्रा नॅशनल हायवेवर ही दुर्घटना घडली.

5/7
संपूर्ण कार ट्रेलरमध्ये घसरली होती. या कारला ट्रेलरमधून बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. क्रेनने ओढून कारला वेगळं करावं लागलं. कार चालकाचं डोक्यापासून छातीपर्यंतचा काही भाग हा ट्रेलर आणि कारच्या मध्ये अडकला होता.

6/7
ट्रेलरमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पत्रा कापावा लागला. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हे सगळे दौरा इथले रहिवासी होते. सहा मित्रांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

7/7
 समय सिंह, लोकेश, दिलखुश, मनीष, अंकित, नवीन हे सगळे २३ ते २६ वर्ष वयोगटातील तरुण होते. जे एकमेकांचे खास मित्र होते. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement