'कॅटफिशिंग' म्हणजे काय? Valentine Week मध्ये प्रत्येकाला माहिती पाहिजे 'या' गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मॅकॅफीच्या 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालानुसार, भारतातील ऑनलाईन डेटिंगचे वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. चला तर मग जाणून घेऊया, नक्की कॅटफिशिंग काय आहे आणि या व्हॅलेंटाईन वीक मध्ये तुम्हाला सावध राहण्याची गरज का आहे.
मुंबई : फेब्रुवारी महिना सुरू झाला की हवेत प्रेमाचे वारे वाहू लागतात. व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week) मध्ये आपल्या आयुष्यात कुणीतरी खास असावं, असं प्रत्येकाला वाटतं आणि याच भावनेचा फायदा घेतात 'सायबर स्कॅमर्स'. सध्या ऑनलाईन डेटिंगच्या जगात 'कॅटफिशिंग' (Catfishing) नावाचं संकट वेगाने पसरत आहे. मॅकॅफीच्या 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालानुसार, भारतातील ऑनलाईन डेटिंगचे वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. चला तर मग जाणून घेऊया, नक्की कॅटफिशिंग काय आहे आणि या व्हॅलेंटाईन वीक मध्ये तुम्हाला सावध राहण्याची गरज का आहे.
नक्की 'कॅटफिशिंग' म्हणजे काय?
कॅटफिशिंग म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सोशल मीडिया किंवा डेटिंग ॲप्सवर आपली खरी ओळख लपवून, दुसऱ्याचे फोटो आणि खोटी माहिती वापरून एक बनावट प्रोफाईल तयार करते. समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि शेवटी त्यांची आर्थिक किंवा भावनिक फसवणूक करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
advertisement
मॅकॅफी 2026 रिपोर्टमधील धक्कादायक आकडेवारी
भारतीयांवर संकट: सुमारे 33% भारतीयांनी मान्य केले आहे की ते कधी ना कधी 'कॅटफिशिंग'चे बळी ठरले आहेत.
फेक प्रोफाईल्सचा सुळसुळाट: 75% भारतीयांना डेटिंग प्लॅटफॉर्मवर अशा प्रोफाईल्सचा सामना करावा लागला आहे, ज्यांचे फोटो AI (Artificial Intelligence) द्वारे बनवलेले वाटतात. भारतात दर 7 पैकी एका व्यक्तीने रोमान्स स्कॅममध्ये पैसे गमावले आहे, सरासरी 2,80,650 रुपयांचे नुकसान झाले आहे. 18 ते 34 वयोगटातील तरुण या स्कॅम्सचे सर्वात मोठे लक्ष्य आहेत.
advertisement
व्हॅलेंटाईन वीक मध्ये सावध राहणे का गरजेचे आहे?
व्हॅलेंटाईन वीक दरम्यान लोक भावनिकदृष्ट्या अधिक सक्रिय असतात. स्कॅमर्स याच संधीचा फायदा घेतात:
1. भावनिक गुंतवणूक: या दिवसांत लोक एकाकीपणा टाळण्यासाठी घाईघाईने कोणावरही विश्वास ठेवतात.
2. AI चा वापर: मॅकॅफीनुसार, 34% लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी AI ची मदत घेत आहेत. स्कॅमर्स 'AI चॅटबॉट्स' वापरून तुमच्याशी इतक्या नैसर्गिकपणे बोलतात की तुम्हाला समोरची व्यक्ती खरी वाटते.
advertisement
3. फेक ऑफर्स: "व्हॅलेंटाईन स्पेशल" म्हणत तुम्हाला फेक डेटिंग ॲप्सचे इन्व्हाईट्स पाठवले जातात. 60% भारतीयांना अशा लिंक्स आल्या आहेत, ज्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाते.
स्कॅमर्स कशाप्रकारे फसवणूक करतात?
-इमर्जन्सीचे नाटक: आधी विश्वास जिंकायचा आणि मग अचानक "माझा अपघात झालाय" किंवा "बँक खाते फ्रीज झालेय" असे सांगून पैसे मागायचे.
-गिफ्ट स्कॅम्स: "मी तुझ्यासाठी महागडं गिफ्ट पाठवलंय, पण ते कस्टममध्ये अडकलंय, ते सोडवण्यासाठी काही पैसे भर," असं सांगून लुटणे.
advertisement
-सेक्स्टॉर्शन (Sextortion): खाजगी फोटो किंवा व्हिडिओ मिळवून नंतर ब्लॅकमेल करणे.
स्वतःचा बचाव कसा करायचा?
व्हिडिओ कॉल अनिवार्य: जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका. स्कॅमर्स सहसा कॅमेरा समोर येत नाहीत.
पैसे पाठवू नका: ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तीला कधीही पैसे, गिफ्ट कार्ड किंवा क्रिप्टो पाठवू नका.
घाई करू नका: जर एखादी व्यक्ती खूपच लवकर लग्नाच्या किंवा प्रेमाच्या गप्पा मारत असेल, तर सावध व्हा.
advertisement
QR कोडपासून दूर राहा: पेमेंटसाठी पाठवलेले संशयास्पद QR कोड स्कॅन करू नका.
प्रेम शोधणे चुकीचे नाही, पण डिजिटल जगात 'डोळसपणे' प्रेम शोधणे ही काळाची गरज आहे. या व्हॅलेंटाईन वीक मध्ये कोणाला आपले मन देण्यापूर्वी, त्या व्यक्तीची ओळख खरी आहे का, याची खात्री नक्की करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'कॅटफिशिंग' म्हणजे काय? Valentine Week मध्ये प्रत्येकाला माहिती पाहिजे 'या' गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान









