advertisement

Cleaning Tips : वॉशिंग मशीनमध्ये किती डिटर्जंट टाकता? 'या'पेक्षा जास्त टाकाल, तर मशिन आणि कपडेही होतील खराब!

Last Updated:
Right amout of detergent to use in washing machine : आता कामाच्या धावपळीत कोणाकडेच फारसा वेळ नसतो अशावेळी ऑफिसचे काम सोडून घरचे काम करणे निश्चितच अवघड होऊ शकते. म्हणून हल्ली बरेच लोक कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात. वॉशिंग मशीन आपण वापरतो खरी, पण तुम्हाला माहित आहे का? तिच्यामध्ये किती प्रमाणात डिटर्जंट टाकावं? चला पाहूया.
1/7
बऱ्याचदा आपण मशीनमध्ये कपडे धुतो पण ते कपडे एकत्र स्वच्छ होत नाहीत किंवा त्याला कसला तरी वास लागून राहतो. अशावेळी आपल्याला वाटते आपण डिटर्जंट जास्त वापरले पाहिजे. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. कारण डिटर्जंटचे निळे द्रव जास्त झाल्यास ते तुमचे कपडे कडक, भुरकट आणि पांढरे बनवते.

2/7
जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरल्याने केवळ कपड्यांचे नुकसान होत नाही तर तुमच्या वॉशिंग मशीनचेही नुकसान होते. यामुळे वॉशिंग मशीनला साचलेल्या ओलाव्यासारखा वास येतो. चला तर मग जाणून घेऊया वाशीम मशीनमध्ये किती प्रमाणात डिटर्जंट टाकणं योग्य आहे.

3/7
Timesofindia मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, डिटर्जंट कंपन्या मोजण्याचे कॅप्स डिझाइन करतात, जे मोठे असतात. यामुळे तुम्ही स्वतःच कॅप काठोकाठ भरता. आपल्याला असे वाटते की खूप फेस म्हणजे चांगली स्वच्छता. मात्र आधुनिक मशीन्स फोमवर नाही तर घर्षण आणि टंबलिंगवर काम करतात. म्हणून यामध्ये जास्तीचे डिटर्जंट टाकण्याची गरज नाही.

4/7
तुम्ही जास्त डिटर्जंट वापरल्यास तो रिन्स सायकलमध्ये धुवून निघत नाही आणि कपड्यांवर एक चिकट, अदृश्य थर राहतो. हाच थर नंतर घाण आणि धूळ चुंबकासारखी खेचतो. हाच थर आपल्या शरीरासाठीही घातक ठरू शकतो.

5/7
जास्तीच्या डिटर्जंटचे परिणाम केवळ तुमच्या कपड्यांनाच भोगावे लागत नाही तर ते वॉशिंग मशीन बिघाडण्याचेही प्रमुख कारण बनते. तुमच्या मशीनला जास्तीचे सांडपाणी काढून टाकण्यासाठी जास्त वेळ काम करावे लागते, ज्यामुळे पंप आणि मोटरवर मोठा ताण येतो. उरलेला गाळ तुमच्या मशीनच्या कोपऱ्यात आणि क्रॅनीजमध्ये बसतो.

6/7
आता प्रश्न आहे की, मशीनमध्ये नेमके डिटर्जंट किती वापरावे. आत्ताच्या आधुनिक हाय-एफिशियन्सी वॉशिंग मशीनमध्ये मॅनुअलमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण कॅप भरून डिटर्जंटची आवश्यकता नसते. खरं तर तुम्हाला अर्ध्या कॅपची देखील आवश्यकता नाही.

7/7
आत्ताच्या आधुनिक वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी केवळ दोन चमचे डिटर्जंट पुरेसे आहे. हे साधारणपणे एका कॉफी स्कूपइतके असू शकते. तुम्ही पॉड्स वापरत असाल तर एक पुरेशी आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement