advertisement

28.65 KM मायलेज, 6 एयरबॅग्स आणि सनरुफ! ही आहे देशातील सर्वात स्वस्त Hybrid Car

Last Updated:

आज आपण भारतातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या हायब्रिड कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. यामध्ये Maruti Victoris, Grand Vitara, Toyota Hyryder आणि Honda City Hybrid चं नाव आहे. चला याची किंमत आणि खासियतविषयी जाणून घेऊया.

परवडणाऱ्या हायब्रिड कार
परवडणाऱ्या हायब्रिड कार
Most Affordable Hybrid Cars in India: सतत वाढत असणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि कठोर एमीशम नॉर्म्समुळे लोक हायब्रिड कारकडे वळत आहेत. भारतीय मार्केटमध्ये निवडण्यासाठी या सेगमेंटमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. तुम्हीही येत्या काळात Hybrid Car कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
आज आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वात स्वस्त हायब्रिड कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. या गाड्या 16 लाखांपासून ते 20 लाख रुपयां दरम्यान उपलब्ध असतील. ज्याचं मायलेजही 25-28 किमी/लीटरपर्यंत आहे. या सेल्फ-चार्जिंग हायब्रिड आहेत. ज्यामध्ये बॅटरी स्वतः चार्ज होते आणि प्लग-इनची गरज नसते. चला याची किंमत आणि खासियतविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
Maruti Suzuki Victoris
मारुती विक्टोरिस सध्याच्या काळात देशातील सर्वात स्वस्त Hybrid Car आहे. भारतीय मार्केटमध्ये ही फक्त 10.49 लाख रुपयांच्या सुरुवाती एक्स शोरुम किंमतीत खरेदी करु शकतात. तसंच स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंट VXi ची एक्स-शोरुम किंमत जवळपास 16.38 लाख रुपयांपासून सुरु होते. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे जी स्टायलिश डिझाइन, स्पेसियस इंटीरियर आणि हाय फ्यूल एफिशिएन्सीसाठी ओळखली जाते.
advertisement
यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा समावेश आहे, जे 114-120 bhp पॉवर देते. एआरएआयने दावा केलेला मायलेज 28.65 किमी/लीटर पर्यंत आहे. 9 इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अ‍ॅपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, सहा एअरबॅग्ज आणि एलईडी हेडलाइट्स या फीचर्सचा समावेश आहे.
Maruti Grand Vitara
मारुती ग्रँड विटारा देशातील सर्वात प्रसिद्ध Hybrid SUV आहे. याचे स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटची किंमत 16.63 लाख रुपयांपासून सुरु होते. ही टोयोटा हायरायडरची ट्विन आहे. मात्र मारुती ब्रांडिंगसह येते. 1.5 लिटर K15C इंजन + इलेक्ट्रिक मोटरने . 27.97 किमी/लिटर ARAI मायलेज मिळते.
advertisement
फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, व्हेंटिलेटेड सीट्स, ADAS फीचर्स (काही व्हेरिएंट्समध्ये), वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. ही SUV उच्च ग्राउंड क्लिअरन्स आणि ऑफ-रोड क्षमता देते. मारुती असल्याने, सुटे भाग स्वस्त आहेत आणि सेवा केंद्रे सहज उपलब्ध आहेत. तुम्ही प्रीमियम फील आणि फ्यूचरिस्टिक फीचर्स शोधत असाल, तर ग्रँड विटारा हा एक चांगला पर्याय आहे.
advertisement
Toyota Hyryder
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर ग्रँड विटाराची ट्विन आहे. मात्र टोयोटा ब्रांड व्हॅल्यूसह येते. याच्या स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंट V ची किंतम जवळपास 16.66 लाख रुपयांपासून सुरु होते आणि टॉपपर्यंत 20 लाखांच्या आसपासपर्यंत जाते. यामध्येही तेच 1.5 लिटर इंजिन + हायब्रिड सिस्टम आहे. ज्या 27.97 किमी/लिटर मायलेज देतात.
advertisement
फीचर्समध्ये 9-इंच इंफोटेनमेंट, व्हेंटिलेटेड सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि चांगल्या सेफ्टी रेटिंगचा समावेश आहे. टोयोटाची रीसेल व्हॅल्यू खुप हाय आहे जी दीर्घकाळात फायदेशीर ठरते. तुम्ही ब्रांड रिलायबिलिटी आणइ लो मेंटेनेंस हवे असेल तर हायरायडर बेस्ट आहे.
Honda City
होंडा सिटी हायब्रिड ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी हायब्रिड सेडान आहे. ZX व्हेरिएंटची किंमत सुमारे 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, ती e:HEV टेक्नॉलॉजी वापरते आणि 1.5-लिटर इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरद्वारे 27.13 किमी/लीटर ARAI मायलेज देते.
advertisement
फीचर्समध्ये ADAS, 8-इंच टचस्क्रीन,  वायरलेस चार्जिंग, सनरुफ, 6 एयरबॅग आणि प्रीमियम इंटीरियर आहे. सेडान असल्याने हँडलिंग चांगली आणि राइड कंफर्टेबल आहे. होंडाची बिल्ड क्वालिटी आणि रिफाइनमेंट टॉप क्लास आहे. तुम्हाला सेडान आवडत असेल आणि कंफर्ट तुमची प्रायोरिटी असेल तर सिटी हायब्रिड चांगला ऑप्शन आहे. खरंतर एसयूव्हीच्या तुलनेत स्पेस कमी आहे.
आमचा सल्ला: या चार कारची तुलना केल्यास, मारुती व्हिक्टोरिस सर्वात स्वस्त आहे (16.38 लाख रुपयांपासून), त्यानंतर ग्रँड विटारा (16.63 लाख)), हायराइडर (16.66 लाख) आणि सिटी (20 लाख). तिन्ही एसयूव्ही समान मायलेज (27-28 किमी/लीटर) देतात, तर सिटी थोडी कमी पण सेडानसारखा अनुभव देते. तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजांनुसार एक निवडू शकता.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
28.65 KM मायलेज, 6 एयरबॅग्स आणि सनरुफ! ही आहे देशातील सर्वात स्वस्त Hybrid Car
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement