advertisement

जे कुणाला जमलं नाही ते प्रतिभाने करून दाखवलं! फक्त ५०० रुपये भांडवल गुंतवलं, या शेतीतून महिन्याला करतेय २ लाखांची कमाई

Last Updated:

Success Story : “जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही,” हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी यशोगाथा आहे प्रतिभा झा यांची...

Success Story
Success Story
मुंबई : “जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही,” हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी यशोगाथा आहे प्रतिभा झा यांची. टोमणे, अडचणी आणि सामाजिक बंधने यांना न जुमानता त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला आणि आज त्या यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात. बिहारमधील दरभंगा येथील प्रतिभा झा यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून उभा केलेला मशरूम व्यवसाय आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
वयाच्या १५ व्या वर्षी झालं लग्न
अवघ्या १५व्या वर्षी लग्न झाल्यानंतर “महिला घराबाहेर काम करू शकत नाहीत” अशा मानसिकतेचा सामना करताना त्यांचा संघर्ष सुरू झाला. मात्र, स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द त्यांनी कधीच सोडली नाही. केवळ ५०० रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेला त्यांचा मशरूम शेती व्यवसाय आज दरमहा सुमारे २ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
५०० रुपयांतून उभारला व्यवसाय
प्रतिभा झा यांचे बालपण मुझफ्फरपूर येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना मशरूम शेतीची आवड होती. लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकूनही त्यांनी आपले स्वप्न जिवंत ठेवले. पतीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी २०१५ मध्ये मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर घरातील १०x१० फुटांच्या छोट्या खोलीत त्यांनी ऑयस्टर मशरूमची लागवड सुरू केली. या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केवळ ५०० रुपयांत केली होती.
advertisement
सुरुवातीचा खरतड प्रवास
प्रारंभीचा प्रवास मात्र सोपा नव्हता. पहिल्याच हंगामात त्यांना फक्त १,००० रुपयांचे उत्पन्न मिळाले. मिल्की मशरूमची लागवडही अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही. पण या अपयशाने खचून न जाता त्यांनी त्यातून शिकण्याचा मार्ग निवडला. बियाण्यांची कमतरता दूर करण्यासाठी त्यांनी दिल्लीतील पुसा संस्थेत प्रशिक्षण घेतले आणि स्वतःच मशरूम बियाणे तयार करण्यास सुरुवात केली. साध्या उपकरणांच्या मदतीने त्यांनी रोज सुमारे १० किलो बियाणे तयार करून खर्च कमी केला आणि नफा वाढवला.
advertisement
ग्राहकांचा विश्वास जिंकला
सुरुवातीला स्थानिक बाजारात मशरूमला मागणी नव्हती. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी अतिशय कमी दरात मशरूम विक्री सुरू केली. त्यासोबतच लोणचे, पापड आणि स्नॅक्स यांसारखी मूल्यवर्धित उत्पादनेही तयार केली. हळूहळू लोकांना त्यांच्या रसायनमुक्त आणि ताज्या मशरूमची गुणवत्ता पटू लागली. आज त्या ताज्या, वाळवलेल्या मशरूमसह बियाण्यांची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
advertisement
हजारो शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक
प्रतिभा झा यांचे यश केवळ वैयक्तिक मर्यादेत राहिले नाही. २०१८ पासून त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे, त्या प्रशिक्षित शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदी करून त्यांना बाजारपेठही उपलब्ध करून देतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
जे कुणाला जमलं नाही ते प्रतिभाने करून दाखवलं! फक्त ५०० रुपये भांडवल गुंतवलं, या शेतीतून महिन्याला करतेय २ लाखांची कमाई
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement