21 वर्षीय तरुणाच्या त्या कृत्याला कंटाळली; पुण्यातील अल्पवयीन मुलगी इमारतीवर चढली अन् धक्कादायक पाऊल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बाणेर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीने तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं.
पुणे: पुण्यातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात प्रेमसंबंधानंतर लग्नाला नकार देत आणि आर्थिक फायदा घेत एका तरुणीनी फसवणूक केली. याच धक्क्यातून तरुण सराफ व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहित आपलं आयुष्य संपवलं. यानंतर आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बाणेर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीने तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 17 वर्षाच्या साक्षीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गोरख सुग्रीव गोरे (वय २१, मूळ रा. जालना, सध्या रा. बालेवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोरख गोरे हा गेल्या काही दिवसांपासून साक्षीला मानसिक त्रास देत होता. साक्षीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो वारंवार देत होता. या ब्लॅकमेलिंगमुळे साक्षी प्रचंड तणावाखाली होती. या धमक्यांना आणि होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी तिने बाणेर येथील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. साक्षीचा भाऊ दीपक याने दिलेल्या फिर्यादीवरून बाणेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी तरुणाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोशल मीडियाचा वापर करून अल्पवयीन मुलींना कशा प्रकारे लक्ष्य केले जाते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 7:28 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
21 वर्षीय तरुणाच्या त्या कृत्याला कंटाळली; पुण्यातील अल्पवयीन मुलगी इमारतीवर चढली अन् धक्कादायक पाऊल










