अजितदादांच्या मृतदेहाबाबत डॉक्टर काय म्हणाले होते? रोहित पवारांचा नवा खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली आहे.
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. अजित पवारांचा अपघात कसा झाला? ते कारने पुण्याला जाणार होते, मग विमानाने का गेले? यात कुणाचा सहभाग असावा, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. शिवाय अजित दादांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर कंपनीवर देखील त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले.
आता रोहित पवार यांनी नवीन खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाबद्दल डॉक्टरांनी काय माहिती दिली होती, याबाबत खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे. त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा नवीन खुलासा केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असंही ते म्हणाले.
खरं तर, ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओज व्हायरल झाले होते. ज्यात अजित पवारांचा मृतदेह काही प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. याबाबतचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील केला होता. आता हाच मुद्दा रोहित पवारांनी अधोरेखित केला आहे. "अजित पवार यांचा मृतदेह जास्त फुगला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांची बॉडी फार जास्त ( abnormal) फुगली होती, अशी नवी माहिती रोहित पवारांनी दिली. यामुळे आता अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ वाढतच चाललं आहे.
advertisement
अजित पवारांचा अपघात कसा झाला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात झाला. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने (Learjet 45) निघाले होते. बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते जाणार होते. मात्र सकाळी ८:४३ ते ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ हे विमान कोसळले.
advertisement
विमान धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर काही स्फोटही झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी आणि दोन वैमानिक (कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक) अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. आता या सगळ्या घटनेवर रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली असून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 2:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या मृतदेहाबाबत डॉक्टर काय म्हणाले होते? रोहित पवारांचा नवा खुलासा








