advertisement

BBM च्या घरात राखी बनली पोलीस, प्रभूच्या इंग्रजीनं घालता घोळ; ऐकून हसू आवरणार नाही, VIDEO

Last Updated:

Rakhi Sawant : राखी सावंत Bigg Boss Marathi 6 च्या घरातील चोराचा छडा लावणार. पण चोर शोधताना प्रभूच्या इंग्रजीनं चांगलाच घोळ घालता. घरात एकच हशा पिकला.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सकाळी सकाळी चोरी झाली.  घरातील सदस्य उठून किचनमध्ये गेले तर गॅसवरच्या शेगड्याच गायब असल्याचं लक्षात आलं. रोजप्रमाणे नाश्त्याची तयारी करण्यासाठी सगळे किचनमध्ये जमा झाले होते. मात्र शेगड्या दिसत नसल्याने एकच खळबळ उडाली.
प्रभूला भूक लागलेली असल्याने तो मोठ्याने म्हणाला, "मला भूक लागली आहे." त्यावर सागरनं म्हटलं, "अरे थांब, इथे हे चोरीला गेलं आहे." सगळ्यांनी पाहिलं तर खरंच गॅसवरच्या शेगड्या गायब होत्या.  या सगळ्या प्रकारानंतर घरात चोर शोधण्याची मोहीम सुरू झाली. बिग बॉसच्या घरात 'बीबी पोलीस' अॅक्टिव्ह झाले. ड्रामा क्विन राखी सावंतने सगळी जबाबदारी घेतली. राखीने पोलिसांचा वेश परिधान केला आणि पूर्णपणे भूमिकेत शिरली. "जय महाराष्ट्र, चला हवलदार, चोराला पकडूया", असं म्हणत तिनं शोधमोहीम सुरू केली.
advertisement
राखीच्या या अवतारामुळे घरात हशा पिकला. चोर कोण हे शोधण्यासाठी घरातील वातावरण पूर्णपणे टास्क मोडमध्ये गेलं होतं. दरम्यान नाश्ता बनवायची जबाबदारी दिपालीवर असल्यानं ती देखील चिडली. ती म्हणाली, "पाच मिनिटांत हे मिळालं तर ठीक, नाहीतर मी पोहे बनवणार नाही." तिच्या या वक्तव्यामुळे सगळे अधिकच सतर्क झाले.
advertisement
शोधाशोध सुरू असताना राखीने दरवाज्याजवळ विशालला पकडलं आणि लगेच जाहीर केलं, "हा चोर आहे." त्यावर प्रभूने लगेच इंग्रजीत भन्नाट डायलॉग मारला You are underwear arrest. प्रभूला under arrest म्हणायचं होतं पण चुकून underwear arrest म्हणाला. प्रभूच्या इंग्रजीचा घोळ ऐकून घरात एकच हशा पिकला.



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
प्रभूचं हे बोलणं ऐकून सगळेच वेडे होऊन हसू लागले. तणावाचा माहोल क्षणात हलका झाला. बिग बॉस मराठी 6 च्या घरातला हा किस्सा प्रेक्षकांसाठी मात्र जबरदस्त एंटरटेनमेंट ठरला. आता घरात गॅसच्या शेगड्यांची चोरी नेमकी कोणी केली? विशालच चोर होता का? राखीनं चोराला कसं पकडलं? चोरीमुळे घरात कोणता ड्रामा होणार हे पाहणं आजच्या भागात इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM च्या घरात राखी बनली पोलीस, प्रभूच्या इंग्रजीनं घालता घोळ; ऐकून हसू आवरणार नाही, VIDEO
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement