'त्यांनी कट रचला, माझं गर्भाशय काढलं', गायक उदित नारायण पुन्हा अडचणीत; पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Udit Narayan Controversy : प्रसिद्ध गायक उदित नारायण पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. यांची पहिल्या पत्नी रंजना झा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कौंटुबिक वादात अडकले आहेत. अशातच त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत. त्यांची पहिली पत्नी रंजना नारायण झा यांनी सुपौल महिला पोलिस ठाण्यात उदित नारायण आणि त्यांच्या दोन भावांविरुद्ध आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीविरुद्ध गंभीर गुन्हेगारी आरोपांसह तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात.
advertisement
advertisement
उदित नारायण यांच्या पहिल्या पत्नी रंजना झा यांचं 7 डिसेंबर 1984 रोजी पारंपरिक पद्धतीनं लग्न झालं. लग्नानंतर काही काळानंतर उदित आपल्या करिअरसाठी मुंबईला गेले. तेव्हाच दोघांचं वैवाहिक आयुष्य खऱ्या अर्थानं दुरावलं असं रंजना यांनी सांगितलं. त्यानंतर माध्यमांद्वारे त्यांना कळलं की उदित यांनी पुन्हा लग्न केलं आहे. त्यांनी याबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांना योग्य उत्तर मिळालं नाही.
advertisement
रंजना झा यांनी त्यांच्या अर्जात केलेला सर्वात गंभीर आरोप 1996 मधील एका घटनेशी संबंधित आहे. त्यांचा दावा आहे की त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय त्यांचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं. त्यांना हे खूप नंतर म्हणजेच दुसऱ्या उपचारादरम्यान कळलं. हा सुनियोजित कट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचल्या असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
रंजना झा आता 61 वर्षांच्या आहेत आणि या वयात त्या आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडचणींशी झुंजत आहेत. वारंवार आश्वासन देऊनही त्यांना कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. म्हणूनच पुन्हा एकदा महिला पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही सूडासाठी नाही तर त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि हक्कांसाठी लढत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
सुपौल महिला पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या अर्जानंतर पोलीस तपास प्रक्रिया सुरू करतील. आरोप गंभीर आहेत आणि प्रत्येक पैलूची कायदेशीर तपासणी आवश्यक आहे. दरम्यान या नवीन आरोपावर उदित नारायण किंवा त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या आरोपाची सत्यता आता पोलीस प्रक्रियेद्वारे तपासली जाईल. सध्या हा एका पक्षाचा दावा आहे आणि कायदेशीररित्या अद्याप पडताळणी झालेली नाही.










