advertisement

पत्नी रोज ‘तोच’ प्रश्न विचारायची, पतीचं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ!

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: पत्नीच्या सततच्या संशय, भांडण आणि मानसिक त्रासामुळे रविनाथ प्रचंड तणावाखाली होता.

पत्नी रोज ‘तोच’ प्रश्न विचारायची, पतीचं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ! (Ai Photo)
पत्नी रोज ‘तोच’ प्रश्न विचारायची, पतीचं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ! (Ai Photo)
छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पहाडसिंगपुरा परिसरात घडली आहे. याप्रकरणी विवाहित पत्नीविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविनाथ रामकृष्ण बर्डे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणात मृताचा भाऊ अमोल रामकृष्ण बर्डे (रा. हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ‎रविनाथ बर्डे यांनी 9 फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गुरुगणेशनगर येथील श्री साई लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी शिवानी हिचा रविनाथवर सतत संशय होता. “तू कोणत्या मुलीशी बोलतोस?” असा आरोप करत ती नेहमी भांडण करत असे. यासोबतच तिने त्याला आपल्या मुलाशीही नीट बोलू दिले नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
advertisement
‎पत्नीच्या या सततच्या संशय, भांडण आणि मानसिक त्रासामुळे रविनाथ प्रचंड तणावाखाली होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने श्री साई लॉज, गुरुगणेशनगर येथे गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
‎दरम्यान, पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहित पत्नीविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नी रोज ‘तोच’ प्रश्न विचारायची, पतीचं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement