advertisement

Cooling Herbs : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतील ही 5 पानं! स्वस्तात मस्त उपाय, अजिबात होणार नाही उष्णतेचा त्रास

Last Updated:

आपण शरीर थंड राहण्यासाठी पाणी आणि इतर पेय घेतो. पण तेही जास्त प्रमाणात आपल्याला घ्यावेसे वाटत नाही. अशावेळी काही पानं आपल्याला हायड्रेशनसाठी मदत करतात.

शरीराला थंडावा देणाऱ्या औषधी वनस्पती
शरीराला थंडावा देणाऱ्या औषधी वनस्पती
मुंबई : आता कडक उन्हाळा सुरु झालाय. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या लोकांना आपल्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. नाहीतर उष्माघात किंवा ऊन लागण्याचा त्रास होतो. अशावेळी आपण शरीर थंड राहण्यासाठी पाणी आणि इतर पेय घेत असतो. पण तेही जास्त प्रमाणात आपल्याला घ्यावेसे वाटत नाही. अशावेळी काही पानं आहेत जी आपल्याला हायड्रेशनसाठी मदत करतात.
उष्णता आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी आहारात बदल करणं आवश्यक असतं. या ऋतूत शरीराला थंडावा देणारे आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करणारे पदार्थ खायला हवे. आज आम्ही ज्या पाच औषधी पानांबद्दल सांगत आहोत, ते उन्हाळ्यात पोटातील जळजळ आणि त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय मानले जातात. ही पानं शरीराला आतून थंडावा देतात आणि पचनक्रियाही निरोगी ठेवतात.
advertisement
या औषधी पानांचा करा आहारात समावेश..
पुदिना : उन्हाळ्यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पानांपैकी एक म्हणजे पुदिना. पुदिन्याचा थंडावा देणारा गुणधर्म शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. तुम्ही पुदिन्याचा वापर चटणी, ताक, ड्रिंक्स आणि सॅलडमध्ये करू शकता. पोटातील उष्णता, गॅस, आम्लपित्त आणि जळजळ कमी करण्यासाठी पुदिना अत्यंत प्रभावी आहे. पुदिना त्वचेवर लावल्याने मुरुम आणि पुरळ अशा समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.
advertisement
बेलाचं पानं : उन्हाळ्यात बेलाच्या फळाचा ज्यूस तर सगळेच पितात. पण त्याची पानं खाल्ल्यानेसुद्धा फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 बेलाची पानं चावल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो आणि कडक उन्हापासूनही संरक्षण होतं. बेलाची पानं पचनसंस्था सुधारतात, या पानांचा चहा किंवा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तासारख्या जुनाट त्रासांमध्येही आराम मिळतो.
advertisement
कोथिंबीर : उन्हाळ्यात हिरवीगार कोथिंबीर देखील अत्यंत फायदेशीर मानली जाते. तिच्या थंड गुणधर्मांमुळे ती शरीराला आतून थंडावा देते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय कडक उन्हात डिहायड्रेशन टाळण्यासही कोथिंबीर फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त ती नैसर्गिकरित्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
advertisement
लेमनग्रास : लेमनग्रास चहा उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतो. तो केवळ शरीराला थंडावा देत नाही, तर पचनक्रिया देखील सुधारतो. त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील उष्णता, मानसिक ताण आणि पोट फुगणे कमी करण्यास मदत करतात. याचा वापर तुम्ही चहा, डिटॉक्स वॉटर, सूप आणि सॅलडमध्येही सहजपणे करता येतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cooling Herbs : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतील ही 5 पानं! स्वस्तात मस्त उपाय, अजिबात होणार नाही उष्णतेचा त्रास
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement