advertisement

चुकूनही फॅमिलीसोबत पाहू नका महेश मांजरेकरांची 'ही' फिल्म, बोल्ड सीन्समुळे झालेली बॅन, आता OTT वर घालतेय धुमाकूळ

Last Updated:
Mahesh Manjrekar Bold Film Trending on OTT: महेश मांजरेकर दिग्दर्शित हा कल्ट सिनेमा २०२२ साली जेव्हा रिलीज झाला, तेव्हा एकच गोंधळ उडाला. यातील बोल्ड कंटेंट, शिवीगाळ यामुळे प्रेक्षकांचा संताप अनावर झाला होता.
1/7
सिनेसृष्टीत काही सिनेमे त्यांच्या कथेमुळे गाजतात, तर काही त्या फिल्मच्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे. आजवर अनेक सिनेमे आले, ज्यांच्या विरोधात प्रेक्षक आणि सेन्सॉर बोर्डाने कठोर कारवाई केली. मराठी सिनेसृष्टीत एक असा सिनेमा आला, ज्याने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून खळबळ उडवली.

2/7
भरभरून अश्लीलता, टोकाचा हिंसाचार आणि बोल्ड सीन्समुळे या मराठी सिनेमावर चार वर्षांपूर्वी बंदी आणली होती. मात्र, ही फिल्म आता यूट्यूबवर धुमाकूळ घालतेय. विशेष म्हणजे मराठीतील दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे.

3/7
महेश मांजरेकर दिग्दर्शित हा कल्ट सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२२ साली जेव्हा ही फिल्म रिलीज झाली, तेव्हा एकच गोंधळ उडाला. सेन्सॉर बोर्डाने या फिल्ममधील काही सीन्स कमी केले असले, तरीही यातील बोल्ड कंटेंट, शिवीगाळ यामुळे प्रेक्षकांचा संताप अनावर झाला. अखेर प्रेक्षकांचा विरोध पाहून या फिल्मवर बंदी घालण्यात आली.

4/7
ही फिल्म आहे 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'. या फिल्ममध्ये महेश मांजरेकर यांनी चित्रपटात गुन्हेगारी विश्वाचं असं काही भीषण वास्तव मांडलं आहे, जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा येईल. यातील बोल्ड सीन्स आणि हिंसाचार इतकी उघडपणे मांडली आहेत की, ही फिल्म कुटुंबासोबत पाहणे शक्यच नाही.

5/7
या फिल्मची कथा १५-१६ वर्षांच्या मुलाभोवती फिरते, ज्यांचे वडील एक गँगस्टर असतात आणि त्यांची एका गँगवॉरमध्ये हत्या होते. आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी ही मुलं गुन्हेगारी जगात पाऊल ठेवतात. वय कमी असलं तरीही त्यांचं डोकं एखाद्या गुंडापेक्षाही क्रूर आणि शातिर असतं.

6/7
ही एक उत्तर क्राइम थ्रिलर असली, तरीही यामधील नको तितके बोल्ड सीन्स आणि रक्तपातामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. IMDb वर या चित्रपटाला ६.३ रेटिंग मिळाले आहे. या फिल्मला थिएटरमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला, तरीही यूट्यूबवर प्रेक्षकांनी या फिल्मला डोक्यावर घेतलं आहे.

7/7
ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्ली शिव्या आणि बोल्ड सीन्सचा भडिमार असतोच, पण 'नाय वरनभात लोन्चा...' ने त्याही पलीकडची मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं जातंय. NH Marathi या यूट्यूब चॅनलवर या चित्रपटाचे अनकट व्हर्जन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत ३.६ मिलियन म्हणजेच ३६ लाखांहून अधिक लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement