advertisement

घरात झोपली होती तरुणी, सकाळी उठताच झाला मृत्यू, मध्यरात्री घडलं भयंकर, बुलढाण्यातील मन हेलावणारी घटना!

Last Updated:

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. देऊळगाव कुंडपाळ येथे एका १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू
सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. देऊळगाव कुंडपाळ येथे एका १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित तरुणीने रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत एकत्र जेवण केलं होतं. ती आपल्या आई वडिलांशेजारी झोपली होती. मात्र मध्यरात्री तिच्यासोबत आक्रीत घडलं. सकाळी झोपेतून उठताच तिला त्रास जाणवू लागला. घसा दुखू लागला. उलट्या होऊ लागल्या. रात्री झोपताना धडधाकट असलेल्या तरुणीसोबत अचानक हा प्रकार घडत असल्याने कुटुंबीय घाबरले.
कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयातही दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला रात्री झोपेत असताना एका विषारी सापाने दंश केला होता. यातच तिचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. साक्षी रवींद्र सानप असं मृत पावलेल्या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी रवींद्र सानप (वय १९) ही तरुणी शुक्रवारी रात्री आपल्या आई-वडिलांशेजारी घरात झोपली होती. रात्रीच्या वेळी झोपेत असतानाच एका विषारी सापाने तिला दंश केला. सापाने दंश केला असला तरी सुरुवातीला तिला फारसा त्रास जाणवला नाही, त्यामुळे तिने किंवा तिच्या कुटुंबीयांनी रात्री काहीच लक्ष दिलं नाही.
advertisement
४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास साक्षी झोपेतून उठली, तेव्हा तिच्या घशात प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि तिला अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला तिला ॲसिडिटी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज तिच्या आई-वडिलांनी लावला. मात्र, वेळ जाईल तसा तिचा त्रास वाढत गेला, त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी तिला तात्काळ लोणार येथील रुग्णालयात दाखल केले.
advertisement
लोणार येथील डॉक्टरांनी तपासणी सुरू केली असता, साक्षी उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. तिची लक्षणे पाहून डॉक्टरांना सर्पदंशाचा संशय आला. तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने मेहकर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाईक तिला घेऊन मेहकरकडे निघाले, परंतु दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिची प्राणज्योत मालवली. काही वेळानंतर साक्षीच्या घराशेजारील अंगणातच तो विषारी साप आढळून आला, ज्यामुळे तिचा मृत्यू सर्पदंशामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरात झोपली होती तरुणी, सकाळी उठताच झाला मृत्यू, मध्यरात्री घडलं भयंकर, बुलढाण्यातील मन हेलावणारी घटना!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement