advertisement

Lonavala: बास्केटबॉल स्टँड कोसळून पोरगा जागेवर गेला, तासभर रक्ताच्या थारोळ्यात तरी मदत नाही

Last Updated:

इन्स्टिट्यूटच्या आवारात उभारलेला बास्केटबॉल स्टँड अचानक कोसळून विशाल वर्मा याच्या डोक्यावर पडला.

लोणावळ्यात मुलाचा मृत्यू
लोणावळ्यात मुलाचा मृत्यू
अनिस शेख, प्रतिनिधी, लोणावळा (पुणे) : इंदुरी येथील तोलानी मॅरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, विशाल वर्मा या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूटच्या आवारात उभारलेला बास्केटबॉल स्टँड अचानक कोसळून विशाल वर्मा याच्या डोक्यावर पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला तळेगाव येथील मायमर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर संस्थेच्या परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इन्स्टिट्यूटमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. नेमकी घटना कशामुळे घडली याचा शोध पोलीस घेत आहेत.

घटना घडल्यानंतर विशाल जवळपास तासभर रक्ताच्या थारोळ्यात

आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. बास्केटबॉलचा स्टँड अचानक निखळून थेट विशालच्या डोक्यावर पडला. धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत विशाल जवळपास तासभर घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडून होता, मात्र त्याला तातडीने कोणतीही मदत मिळाली नाही.
advertisement

विशाल जागेवर गेला, विद्यार्थी आक्रमक

या घटनेनंतर इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी कमालीचे आक्रमक झाले आहेत. शाळा प्रशासनाच्या विरोधात त्यांनी जोरदार निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. दरवर्षी ७ लाख रुपये देऊनही मेडिकल फॅसिलिटी मिळत नसल्याचा विद्यार्थांचा आरोप आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Lonavala: बास्केटबॉल स्टँड कोसळून पोरगा जागेवर गेला, तासभर रक्ताच्या थारोळ्यात तरी मदत नाही
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement