advertisement

शिकण्याची जिद्द मोठी, सुट्टीत करायचा केटरिंगचा काम, पण 'ती' काळरात्र आली आणि सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: मध्यरात्री काम संपल्यानंतर वाहनाची सोय नसल्याने अनिकेत, मनोज भिलन आणि इतर मित्र पायी पहाडसिंगपुराकडे निघाले होते.

शिक्षणाची जिद्द मोठी, सुट्टीत करायचा केटरिंगचा काम, पण 'ती' काळरात्र आली आणि सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं
शिक्षणाची जिद्द मोठी, सुट्टीत करायचा केटरिंगचा काम, पण 'ती' काळरात्र आली आणि सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं
‎छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच शहरातील हर्सूल परिसरामध्ये एका तरुणाचा भीषण अपघात झाला आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला. रविवारी (8 फेब्रुवारी) मध्यरात्री हर्सूल परिसरातील जुना जकात नाका भागात हा भीषण अपघात घडला. या घटनेत अनिकेत दिलीप निंबाळकर (23, रा. न्यू पहाडसिंगपुरा) या तरुणाचा जीव गेला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
‎अनिकेत निंबाळकर हा मूळचा लांडून (जि. बुलढाणा) येथील रहिवासी होता. रविवारी तो त्याच्या मित्रांसह आईसाहेब लॉन्स येथे केटरिंगच्या कामासाठी गेला होता. मध्यरात्री काम संपल्यानंतर वाहनाची सोय नसल्याने अनिकेत, मनोज भिलन आणि इतर मित्र पायी पहाडसिंगपुराकडे निघाले होते. या वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच 20 एफयू 7575) अनिकेत आणि मनोजला जोराची धडक दिली.
advertisement
या भीषण अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान पहाटे पावणेचारच्या सुमारास अनिकेतचा मृत्यू झाला. मनोज भिलन याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी कारचालक मंगेश कोलते याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
अनिकेत हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात ‘एमएसडब्ल्यू’च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. सुट्टीच्या दिवशी तो केटरिंगचे काम करीत होता. घरी वडील शेती करतात, तर आई आणि मोठा भाऊ कंपनीत काम करून त्याच्या शिक्षणाला हातभार लावत होते. या अपघाती मृत्यूने निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
शिकण्याची जिद्द मोठी, सुट्टीत करायचा केटरिंगचा काम, पण 'ती' काळरात्र आली आणि सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement