शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री वातावरण तापलं, पत्नीसोबत भयंकर घडलं, पतीला जन्माची अद्दल
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: मुलीच्या तक्रारीनंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वाद थांबला नाही.
छत्रपती संभाजीनगर : लग्नानंतर पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिला पतीनेच संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. आता पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लईक जावेद अन्सारी असे 36 वर्षीय पतीचे नाव असून तो कन्नड तालुक्यातील कुंजखेडाचा आहे. जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच त्याच्यावर 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मृत रेशमा (वय 23) हिचे आरोपी लईक जावेद अन्सारी याच्याशी घटनेच्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. पहिल्या लग्नातून रेशमाला पाच वर्षांची एक मुलगी असून कौटुंबिक वादामुळे ती पहिल्या पतीपासून वेगळी झाली होती. दुसऱ्या विवाहानंतर काही काळ शांततेत गेला; मात्र त्यानंतर पतीकडून शारीरिक संबंधांच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण सुरू झाल्याचे रेशमाने वारंवार माहेरच्यांना सांगितले होते.
advertisement
मुलीच्या तक्रारीनंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तरीही रेशमावर होणारा छळ थांबला नव्हता, असे तिने पुन्हा माहेरच्यांना कळवले. 24 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री रेशमा माहेरी आली आणि पुन्हा त्रास होत असल्याची माहिती दिली. मात्र रात्री उशीर झाल्याने सकाळी पाहू, असे सांगून तिला परत पाठवण्यात आले.
advertisement
25 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपीने आपला मित्र तौसीफ शेख याला फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. त्यानंतर तौसीफ याने मृत रेशमाचे वडील ईद्रीस मुक्तार शेख (वय 41, रा. इंदिरानगर, कन्नड) यांना फोन करून दोघांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले.
भांडणाची माहिती मिळताच माहेरचे लोक तातडीने रेशमाच्या घरी पोहोचले. मात्र, घराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याचे दिसताच कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला. तेव्हा रेशमा घरात जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेली आढळली. तिच्या गळ्यावर काळसर जखमा दिसून येत होत्या, तर डोळे आणि ओठ सुजलेले होते. तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
advertisement
या प्रकरणी मृत रेशमाचे वडील ईद्रीस मुक्तार शेख यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन निरीक्षक बी.एस. भापकर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी एकूण 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. साक्षी, पुरावे आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 9:32 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री वातावरण तापलं, पत्नीसोबत भयंकर घडलं, पतीला जन्माची अद्दल





