advertisement

Shocking : उच्चशिक्षित महिलेचे धक्कादायक कांड; पुरुषासोबत मिळून रचला भयंकर डाव; संभाजीनगर हादरले

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जमिनीचा 70 लाखांचा बनावट व्यवहार उघडकीस आला आहे. पण अशीच तुमचीही फसवणूक होऊ नये म्हणून नेमका हा प्रकार कसा घडला याबाबत जाणून घेऊयात.

container accident in chhatrapati sambhajinagar
container accident in chhatrapati sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : उच्च शिक्षण आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांचा संगम झाला तर फसवणूक किती योजनाबद्ध आणि धोकादायक असू शकते याचे धक्कादायक उदाहरण करमाड शिवारातील जमीन व्यवहार प्रकरणातून समोर आले आहे.
जमिनीच्या व्यवहारात 'डमी' मालकाचा खेळ
डमी जमीनमालक उभा करून तब्बल 13 एकर मोक्याच्या जमिनीचा 70 लाख रुपयांचा बनावट सौदा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिरुपती येथील एमएस्सी शिक्षित महिलेसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमका कट कसा रचला?
‎जालना रोडवरील करमाड शिवारात हैदराबाद येथील मोठे कंत्राटदार सायन्ना रायचुरी यांची 13 एकर मोक्याची जमीन आहे. ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने मुख्य सूत्रधार राजू जाधव आणि त्याची पत्नी वैशाली जाधव यांनी सखोल कट रचला. मूळ जमीनमालक पुरुष असतानाही त्यांनी तिरुपती येथील व्ही. लता या उच्चशिक्षित महिलेला 13 लाख रुपयांचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर येथे आणले.
advertisement
‎त्यानंतर व्ही. लता हिच्या नावाने नव्हे तर तिला सायन्ना रायचुरी या नावाचे बनावट आधार कार्ड तयार करून डमी जमीनमालक म्हणून उभे करण्यात आले. या बनावट ओळखीच्या आधारे 13 एकर जमिनीचा तब्बल 70 लाख रुपयांचा खोटा व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
या फसवणूक व्यवहारात वापरण्यात आलेले बनावट धनादेश वटवण्यासाठी बंगळुरू येथील गजलक्ष्मी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने मदत केल्याचेही तपासात समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात राजू जाधव, वैशाली जाधव आणि व्ही. लता यांना अटक केली असून व्ही. लताचा पती सुरेश याचा शोध सध्या सुरू आहे.
advertisement
‎जमीन खरेदी करताना हे नक्की तपासा
‎जमीन व्यवहार करताना केवळ कागदपत्रांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही या प्रकरणातून समोर आला आहे.
‎– आधार कार्ड फक्त पाहून समाधान मानू नका, त्याची बायोमेट्रिक आणि ऑनलाइन पडताळणी करा.
‎– जमिनीचा किमान गेल्या 30 वर्षांचा टायटल सर्च रिपोर्ट तपासा.
‎– प्रत्यक्ष जागेवर जाऊन मूळ जमीनमालकाची ओळख पटवा आणि स्थानिक चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे.‎
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Shocking : उच्चशिक्षित महिलेचे धक्कादायक कांड; पुरुषासोबत मिळून रचला भयंकर डाव; संभाजीनगर हादरले
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement