advertisement

Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत वारं फिरलं, थंडीची माघार, आता पारा पस्तीशी पार, 12 फेब्रुवारीला अलर्ट

Last Updated:
Weather Alert in Marathi: महाराष्ट्रातील कोकण ते विदर्भ हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 12 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या मध्यावर थंडीची तीव्रता कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारच्या तुलनेत किमान तापमानात किंचित वाढ झाली असून, दिवसाचे कमाल तापमानही वाढलेले दिसत आहे. सकाळी काही भागांत हलका गारवा जाणवतो, मात्र दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्यामुळे आणि आकाश बहुतांश ठिकाणी स्वच्छ असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. 12 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/5
कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या भागांत आज आंशिक ढगाळ ते स्वच्छ हवामान आहे. मुंबईत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले जात आहे, तर किमान तापमान 22 ते 24 अंशांच्या आसपास आहे. बुधवारच्या तुलनेत तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे. आर्द्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळेत उकाड्याची जाणीव वाढली आहे. या भागात पावसाची कोणतीही नोंद नाही आणि वातावरण स्थिर आहे.

3/5
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांत हवामान कोरडे राहील. येथे कमाल तापमान 32 ते 34 अंशांदरम्यान तर किमान तापमान 16 ते 19 अंशांपर्यंत नोंदवले जाईल. आज पश्चिम महाराष्ट्रात बुधवारच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने गारव्याचा प्रभाव कमी झाला आहे.

4/5
मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज स्वच्छ आणि कोरडे हवामान नोंदवले जात आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. या भागात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे, तर किमान तापमान 18 ते 22 अंशांदरम्यान नोंदले जात आहे. सकाळी हलका गारवा जाणवतो, मात्र दुपारनंतर चांगलाच उन्हाचा कडाका वाढल्यान घामाच्या धारा सुटू लागल्यात.

5/5
एकंदरीत 12 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रात तापमान वाढीचा अलर्ट कायम आहे. हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग कमी होणे, आकाश स्वच्छ राहणे आणि दिवसाच्या वेळेत वाढलेले ऊन ही तापमान वाढीची प्रमुख कारणे आहेत. पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहील त्यासोबतच मुंबई पासून ते पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या वेळेस उन्हाचा पारा वाढलेला असेल

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement