पुणे हादरलं! एकटी बघताच बापानं गाठलं, अल्पवयीन लेकीवर घरातच अत्याचार, चिमुकलीनं रडत गाठलं पोलीस स्टेशन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सकाळी पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने धमकावत तिच्यावर जबरदस्ती केल्याची घटना घडली. या भीषण प्रकारानंतर पीडित मुलीने हिंमत दाखवत पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या वडिलांविरुद्ध तक्रार दिली.
पुणे : ज्या बापावर मुलीच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते, ज्याच्यावर मुलगी डोळे झाकून विश्वास ठेवते, त्याच बापाने आपल्या नात्याला काळिमा फासला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.यात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम वडिलांनी बलात्कार केल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी (३० मार्च) घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी बापाला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई एका खासगी कंपनीत कामाला जाते. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आई कामावर गेली होती. घरी मुलगी आणि तिचे वडील हे दोघेच होते. याचवेळी संधी साधत नराधम बापाने परिस्थितीचा फायदा घेतला. सकाळी पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने धमकावत तिच्यावर जबरदस्ती केल्याची घटना घडली.
या भीषण प्रकारानंतर पीडित मुलीने हिंमत दाखवत पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या वडिलांविरुद्ध तक्रार दिली. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर भारतीय दंड संहिता (IPC) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
advertisement
या घटनेमुळे चाकण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे . आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 12:07 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! एकटी बघताच बापानं गाठलं, अल्पवयीन लेकीवर घरातच अत्याचार, चिमुकलीनं रडत गाठलं पोलीस स्टेशन









