उन्हाळ्यात फ्रिजमुळे होऊ शकतो स्फोट, ‘ही’ घ्या काळजी

उन्हाळ्यात सगळ्यात आधी धाव घेतो ती म्हणजे फ्रिजकडे

घर असो, ऑफिस असो वा दुकान, सध्या फ्रिज 24 तास सुरू आहेत

पण, ज्या फ्रिजमुळे आपल्याला थंडावा मिळतोय, तोच फ्रिज तुमच्या एका छोट्या चुकीमुळे बॉम्ब ठरू शकतो

भिंतीला चिकटवून फ्रिज ठेवू नये, फ्रिजच्या मागच्या बाजूला किमान 5-6 इंच जागा मोकळी असावी

उन्हाळ्यात फ्रिजचा कॉम्प्रेसर खूप गरम होतो, जर हवा खेळती राहिली नाही, तर ओव्हरहीटिंगमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते