कढी सोबत समोसा कधी ट्राय केलाय का?

बटाटा समोसा अगदी बटाटा वड्या प्रमाणे स्ट्रीट फूड मध्ये लोकप्रिय आहे.

तुम्ही आजवर अनेकदा सिंगल समोसा खाल्ला असेल. समोसा बरोबर लाल चटणी लावून पाव देखील खाल्ला असेल.

पण कधी ताकापासून तयार केलेल्या कढीसोबत समोसा खाल्लाय का?

नाशिकमधील माऊली कढी समोसा या ठिकाणी कढीसोबत समोसा खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते.

नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेले माऊली कढी समोसा हे ठिकाण त्याच्या युनिकनेसमुळे शहरात प्रसिद्ध आहे.

लॉकडाऊन नंतर हा कढी समोसा रुपेश गायकवाड यांनी या ठिकाणी विकण्यास सुरू केला.

हा युनिक फूड आयटम खाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

हा युनिक फूड आयटम फक्त 20 रुपयात या ठिकाणी मिळतो.

नाशिकमधील टॉप 3 मिसळ एकदा ट्राय कराच

Learn more