महाराष्ट्रात 5 दिवस तुफान गारपिटीचा अलर्ट!

राज्यात सध्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरु आहे 

या पावसामुळे केळी, द्राक्ष, शेवगा, डाळिंब आणि कांदा पिकांना मोठा फटका बसला आहे

अफगाणिस्तान, पाकिस्तान उत्तराखंडकडून पुढे पश्चिमी विक्षोभ दक्षिणेकडे सरकत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे

30 आणि 31 मार्च रोजी पावसाचा जोर अधिक राहणार असून, काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात