एम एस धोनीचं गाव पाहिलंत का? Photos

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनी त्याच्या कुटुंबासह झारखंडच्या रांची येथील आलिशान फार्म हाऊसमध्ये राहतो.

धोनी रांचीमध्ये लहानाचा मोठा झाला असला तरी त्याचं मूळ गाव हे उत्तराखंडमधील अल्मोडा येथील आहे.

धोनीच्या वडिलांच गाव हे ल्वाली असून हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे.

धोनीचे अनेक नातेवाईक आजही या गावात राहतात.

गेल्यावर्षी धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत मूळगावी गेला होता.

यावेळी 20 वर्षानंतर धोनी त्याच्या मूळगावी पोहोचला होता. यावेळी त्याने साक्षीचा वाढदिवस सुद्धा तिथेच साजरा केला.

एम एस धोनीने यावेळी पत्नी सोबत गावातील हरज्यू देवता मंदिरात पूजा अर्चा केली.

गावातील अनेक महिलांनी यावेळी धोनी आणि साक्षीचे ज्यूडे पूजन करून स्वागत केले.

यावेळी संपूर्ण गावाने एम एस धोनी सोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. .

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा