TRENDING:

ऊस,कांदा,द्राक्षाचा नाद सोडा! या पिकाची लागवड करा, एक लिटर तेलाला मिळतोय १२,००० रु भाव,कराल लाखोंची कमाई

Last Updated:

Smart Farming : भारताची ओळख कृषिप्रधान देश म्हणून जगभर आहे. देशातील अनेक शेतकरी आज पारंपरिक शेतीपद्धतीपलीकडे जाऊन आधुनिक आणि व्यावसायिक शेतीचा अवलंब करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारताची ओळख कृषिप्रधान देश म्हणून जगभर आहे. देशातील अनेक शेतकरी आज पारंपरिक शेतीपद्धतीपलीकडे जाऊन आधुनिक आणि व्यावसायिक शेतीचा अवलंब करत आहेत. परिणामी काही शेतकरी शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत यशस्वी उद्योजक बनले आहेत. मात्र अजूनही बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांवर अवलंबून असल्याने त्यांचे उत्पन्न मर्यादित राहते. अशा परिस्थितीत सुगंधी व औषधी पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक दालन उघडू शकते.
Agriculture News
Agriculture News
advertisement

जिरेनियम लागवड म्हणजे काय?

जिरेनियम (Geranium) हे सुगंधी आणि औषधी गुणधर्म असलेले फुलझाड आहे. याला ‘गरिबांचा गुलाब’ असेही म्हटले जाते. या वनस्पतीच्या पानांपासून काढले जाणारे जिरेनियम तेल अत्यंत मौल्यवान असून त्याला गुलाबासारखा सुगंध असतो. हे तेल अरोमाथेरपी, सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम, साबण आणि औषधनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

औषधी व सौंदर्यविषयक उपयोग

advertisement

जिरेनियम तेलाचा वापर अनेक औषधी कारणांसाठी केला जातो. त्वचेवरील मुरूम, एक्जिमा, जळजळ, संसर्ग यावर हे तेल उपयुक्त मानले जाते. तसेच तणाव कमी करणे, मेंदूशी संबंधित विकारांमध्ये मदत, वृद्धत्वाची लक्षणे कमी करणे, केस व त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही याचा उपयोग होतो. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात या तेलाची मागणी सातत्याने वाढत आहे.

advertisement

मागणी जास्त, उत्पादन कमी

तज्ज्ञांच्या मते, जिरेनियम तेलाची वार्षिक जागतिक मागणी सुमारे १२० ते १३० टन इतकी आहे. मात्र भारतात सध्या केवळ १ ते २ टन उत्पादन होत आहे. त्यामुळे या पिकामध्ये प्रचंड संधी दडलेली आहे. विशेषतः उत्तर भारत आणि कोरडवाहू भागात या पिकाची लागवड यशस्वी ठरू शकते. सरकारकडूनही औषधी पिकांसाठी अनुदान दिले जाते.

advertisement

कमी पाणी, जास्त नफा

जिरेनियम हे कमी पाण्यात येणारे पीक आहे. मध्यम पावसाच्या (१०० ते १५० सें.मी.) भागात त्याची चांगली वाढ होते. वालुकामय चिकणमाती किंवा हलकी कोरडी जमीन यासाठी योग्य ठरते. मातीचा pH ५.५ ते ७.५ दरम्यान असावा.

लागवड आणि व्यवस्थापन

मार्च महिन्यात पॉलीहाऊसमध्ये रोपे तयार करणे फायदेशीर ठरते. सहा महिन्यांनंतर रोपांची छाटणी करून त्यापासून अनेक नवीन रोपे तयार करता येतात. तयार शेतात ५० × ५० सें.मी. अंतरावर लागवड करावी. बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी रोपांवर पूर्वप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

advertisement

खर्च, उत्पादन आणि नफा

एका हेक्टरसाठी अंदाजे ७५ ते ८० हजार रुपयांचा खर्च येतो. योग्य व्यवस्थापन केल्यास एका हेक्टरमधून सुमारे २.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. यामधून जवळपास १.७ लाख रुपयांचा निव्वळ नफा शेतकऱ्याला मिळू शकतो.

तेलाची बाजारभाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

जिरेनियम तेलाचा दर भारतात साधारणतः १२ हजार ते २० हजार रुपये प्रतिलिटर इतका आहे. एकूणच शेतकरी यातून लाखो रुपये कमाई करू शकता.

मराठी बातम्या/कृषी/
ऊस,कांदा,द्राक्षाचा नाद सोडा! या पिकाची लागवड करा, एक लिटर तेलाला मिळतोय १२,००० रु भाव,कराल लाखोंची कमाई
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल