TRENDING:

Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video

Last Updated:

सोयाबीन, कापूस, तूर आणि कांदा या चार प्रमुख पिकांच्या बाजारभावाविषयी आपण मार्केट अपडेट या सेगमेंटमध्ये पाहत असतो. पाहूयात शनिवारी या चार प्रमुख पिकांना कशाप्रकारे दर मिळाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : राज्यातील बाजार समितीमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. सोयाबीन, कापूस, तूर आणि कांदा या चार प्रमुख पिकांच्या बाजारभावाविषयी आपण मार्केट अपडेट या सेगमेंटमध्ये पाहत असतो. पाहूयात शनिवारी या चार प्रमुख पिकांना कशाप्रकारे दर मिळाला.
advertisement

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे दर शनिवारी देखील दबावात असल्याचं पाहायला मिळालं. बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापसाला 7800 ते 8010 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळाला. सावनेर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3500 क्विंटल एवढी राज्यातील सर्वाधिक आवक झाली. तर कापसाला सर्वाधिक 8010 रुपये प्रतिक्विंटल असा दर अकोला बोरगाव मंजु या बाजार समितीमध्ये मिळाला.

advertisement

APMC Market: डाळिंबाची आवक दबावात, केळीचे दर वाढले, आल्याची काय स्थिती?

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी 27 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सोयाबीनला 5435 रुपये एवढा सरासरी दर मिळाला. सोयाबीनची सर्वाधिक 6824 क्विंटल आवक अकोला या बाजार समितीमध्ये झाली तर सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर जालना बाजार समितीमध्ये मिळाला.

advertisement

राज्यातील बाजार समितीमध्ये शनिवारी तुरीची 20667 क्विंटल एवढी आवक झाली तर तुरीला 7800 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. 3800 क्विंटल एवढी आवक अमरावती बाजार समितीमध्ये झाली. तुरीला सर्वाधिक 8600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर जालना बाजार समितीमध्ये मिळाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

राज्यातील बाजार समितीमध्ये खाण्याच्या कांद्याची आवक सातत्याने सुरू आहे. शनिवारी सर्वाधिक 28 हजार क्विंटल कांद्याची आवक पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये झाली. या कांद्याला 350 रुपये प्रतिक्विंटल ते तेराशे रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. राज्यात सर्वाधिक पंचवीसशे रुपये प्रतिक्विंटल एवढा दर अमरावती बाजार समितीमध्ये मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल