advertisement

Success Story : मित्राच्या शेतातून घेतलं पाणी, तरुणाने यशस्वी केली टोमॅटोची शेती, वर्षाला 7 लाख कमाई

Last Updated:

स्वतःचा पाण्याचा कोणताही स्रोत नसतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सुयोग्य नियोजनाच्या जोरावर शेतीतून नफा मिळवला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

+
News18

News18

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील तरुण शेतकरी दयानंद पवार यांनी कठीण परिस्थितीवर मात करत शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघी तीन एकर जमीन आणि स्वतःचा पाण्याचा कोणताही स्रोत नसतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सुयोग्य नियोजनाच्या जोरावर शेतीतून नफा मिळवला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
दयानंद पवार यांनी त्यांच्या उपलब्ध जमिनीपैकी सुमारे दीड एकर क्षेत्र टोमॅटो लागवडीसाठी राखून ठेवले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते सातत्याने या पिकावर भर देत आहेत. सुरुवातीला पाण्याअभावी अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी हार न मानता मित्राच्या बोअरवेलमधून पाणी घेण्याची सोय करून शेती चालू ठेवली.
पाण्याची टंचाई लक्षात घेऊन त्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला. यामुळे कमी पाण्यातही पिकांची चांगली वाढ साधता आली. टोमॅटोसोबतच त्यांनी हंगामानुसार विविध पालेभाज्यांची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत वाढवले. बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य वेळ साधून विक्री केल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळू लागला.
advertisement
या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून दयानंद पवार यांना टोमॅटो शेतीतून दरवर्षी 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. मर्यादित साधनसामग्री असूनही योग्य तंत्रज्ञान आणि नियोजन वापरल्यास शेतीत चांगला नफा मिळवता येतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
दयानंद पवार यांची ही वाटचाल दाखवून देते की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत, नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर यश मिळवता येते. त्यांच्याकडे पाहून परिसरातील अनेक शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळताना दिसत असून, शेतीत नव्या संधी निर्माण होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : मित्राच्या शेतातून घेतलं पाणी, तरुणाने यशस्वी केली टोमॅटोची शेती, वर्षाला 7 लाख कमाई
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement