APMC Market: कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
बाजारातील लाल कांद्याचा सरासरी भाव 600 ते 975 रुपये दरम्यान राहिला. उन्हाळी कांद्याचा बाजारभाव 975 ते 1218 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
सांगली: आज 3 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 74 हजार 394 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 14527 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मिळालेला 1218 रुपये आजचा सर्वाधिक कांद्याचा बाजारभाव ठरला. तसेच बाजारातील लाल कांद्याचा सरासरी भाव 600 ते 975 रुपये दरम्यान राहिला. उन्हाळी कांद्याचा बाजारभाव 975 ते 1218 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 670 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 439 क्विंटल लिंबूस 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल लिंबूस 9500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये द्राक्ष आवक वाढली आहे. आज 1007 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 614 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई बाजारात आवक झालेल्या 393 क्विंटल द्राक्षास 9500 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
मुंबई मार्केटमध्ये 94 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 2400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची केवळ 89 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 220 क्विंटल केळीची सर्वाधिक आवक झाली. त्यास 900 रुपये बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 8:39 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?








