मी त्याच्यावर प्रेम करते! 2 वेळा हॉर्ट ट्रान्सप्लांट, सलमान खानने दिली साथ; रात्रभर तिच्याशी फोनवर बोलायचा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सलमान खानच्या आयुष्यातील 'ती' कोण जिचं 2 वेळा झालं हार्ट ट्रान्सप्लांट. सलमान खानच्या एका फोनने तिला मोठं बळ मिळालं.
सलमान खान हा जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याव्यतिरिक्त आणि बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडण्याव्यतिरिक्त, गेल्या काही वर्षांत तो अनेकदा गरजू चाहत्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. तो विविध धर्मादाय उपक्रमांद्वारे मुलांना आधार देण्यात सक्रियपणे सहभागी झाला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांशी असलेले त्याचे नाते अधिक घट्ट झाले आहे. अलीकडेच सुपरस्टारकडून मदत मिळालेल्या एका चाहतीने सांगितले की, तिच्या कठीण काळात सलमानने तिला शांतपणे आधार दिला. कर्नाटकातील रीना राजू नावाच्या एका महिलेला एक नव्हे, तर दोन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
आरजे सौजन्यासोबत व्हॉइस ऑफ बंगळूरू पॉडकास्टवर बोलताना, रीनाने सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, हार्ट ट्रान्सफ्लांटच्या रात्री सलमान खानने तिला फोन केला होता. तेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये शूटिंग करत होता. ऑस्ट्रेलियामध्ये शूटिंग करत असताना तिच्याशी जवळपास दोन तास बोलला होता.
advertisement
ती म्हणाली, "सलमान सरांबद्दल बोलताना मला गहिवरून येतं. सर्वात आधी मी हे सांगू इच्छिते की, माझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती आणि माझ्या पहिल्या हार्ट ट्रान्सफ्लांटपूर्वी माझ्याकडे त्यांचा नंबर होता. कितीतरी लोक त्यांना मेसेज करत असतील पण त्यांनी उत्तर दिलं आणि मी त्यांना सांगितलं की माझं हार्ट ट्रान्सफ्लांट होत आहे. त्यावेळी ते ऑस्ट्रेलियामध्ये शूटिंग करत होते. माझ्या प्रत्यारोपणाच्या रात्री त्यांनी फोन केला आणि आमच्याशी जवळपास दोन तास बोलले. ते माझ्या कुटुंबाशी खूप आपुलकीने वागले आणि त्यांनी मला यातून जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं."
advertisement
ती पुढे म्हणाली की, त्यानंतर दोन वर्षे तिचा सलमानशी संपर्क नव्हता. पण जेव्हा तिने त्यांना पुन्हा मेसेज केला तेव्हा त्याला ती आठवत होती. रीना म्हणाली, "तिने 'लाईट अ लाईफ' नावाची स्वतःची संस्था सुरू केल्याचे सांगण्यासाठी सलमान खानला फोन केला होता. 2018 मध्ये तिच्या दुसऱ्या ट्रान्सफ्लांट नंतर ती मुंबईत सलमानला पहिल्यांदा त्याच्या घरी भेटली. तिने गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्यासोबत रात्रभर पार्टी केल्याबद्दलही सांगितले.
advertisement
ती पुढे म्हणाली, "त्याच्या अंगी दयाळूपणा ओतप्रोत भरलेला आहे. आम्ही त्याच्या घरी रात्रभर गाणी गात आणि डान्स पार्टी केली. माझ्या दुसऱ्या ट्रान्सफ्लांट नंतर चार महिन्यांनी मला मधुमेह आणि इतर अनेक वैद्यकीय समस्या होत्या. पण तरीही मी खूप मजा करत होते. तो आम्हाला 'रेस 3' च्या सेटवर घेऊन गेला आणि आम्ही तिथे पूर्ण दिवस घालवला. त्याने मला 'बीइंग ह्युमन'ची एक पांढरी सायकल भेट दिली. कारण त्याला आठवले की मी त्याला खूप पूर्वी त्याबद्दल मेसेज केला होता."
advertisement
तिने सांगितले की सलमानसोबतच्या तिच्या काही सर्वात सुंदर आठवणी आहेत. पुढे असेही म्हटले की, जे लोक खरोखरच इतरांची काळजी घेतात, असे लोक क्वचितच भेटतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 8:20 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मी त्याच्यावर प्रेम करते! 2 वेळा हॉर्ट ट्रान्सप्लांट, सलमान खानने दिली साथ; रात्रभर तिच्याशी फोनवर बोलायचा







